नागरिकांनी दक्षता घ्यावी.
नांदगाव खंडेश्वर/उत्तम ब्राम्हणवाडे.
अलीकडच्या काळात तरूण, तरूणी, महिला, पुरुषच नव्हे तर शालेय विद्यार्थी देखील सोशल मिडीयाच्या मायाजाळात गुरफटून गेले आहेत. संवाद, माहिती अन् मनोरंजनाचे प्रमुख साधन असलेल्या सोशल मीडियाचा जसा चांगल्या गोष्टीसाठी फायदा होतो तसाच त्याचा वाईट आणि विघातक कामासाठीदेखील वापर होत आहे. यामुळे सायबर गुन्ह्यात कमालीची वाढ झाली आहे. देव-धर्म, महापुरूष यांच्या बाबत चुकीची माहिती पसरवल्यामुळे व्देष, तणाव वाढत आहे. यामुळेच सोशल मीडियावर व्यक्त होताना जरा जपून अन्यथा जेलची हवा खावी लागूशकते.फेसबुक, व्हाट्सएप, इंस्टाग्राम, युट्युब, ट्वीटर, या समाजमाध्यमांचा वापर वाढल्यानंतर यात काही असामाजिक तत्त्वांची देखील घुसखोरी झाली आहे. अनेकांनी खोटी माहिती भरून वेगवेगळ्या नावाने अकाउंट उघडले आहेत. यातून फसवणूक, बदनामी अशा घटनांमध्ये वाढ झाली आहे. अलीकडच्या काळात तर अनेक ठिकाणी घडलेल्या जातीय आणि सामाजिक तणावाचे कारण समाज माध्यमातील पोस्ट असल्याचे अनेकदा स्पष्ट झाले आहे. यामुळेच सायबर क्राइममध्ये कमालीची वाढ झाली आहे. सोशल मिडीयामुळे शांततेला बाधा येऊ नये, यासाठी पोलिस प्रशासनाने सोशल मिडीयावर वॉच वाढवला आहे.
काळजी न घेतल्यास खावी लागेल जेलची हवाएक छोटी चूक ठरू शकते गुन्हा.
सायबर क्राइमच्या कचाट्यात नाहक गुंतायचे नसेल तर चुकीच्या घटना, अफवा शेअर करू नका, त्यावर कमेंट करू नका, देव, धर्म, महापुरूष याबाबत व्यक्त होताना अवमान होणार नाही, कोणाचे मन दुखावणार नाही, याची काळजी घ्या. एक छोटी चुक गुन्हा दाखल होण्यासाठी पुरेशी आहे. पोलिसांच्या सायबर विभागाचा तिसरा डोळा दुरवरून तुमच्यावर लक्ष ठेवून आहे.
अनेक गुन्हेही दाखल झाले आहेत. यात काहींना जेलची हवाही खावी लागली आहे. यामुळेच सोशल मिडीयावर व्यक्त होताना जरा जपून अन्यथा जेलची हवा खान्याची वेळ येऊ शकते,सोशल मीडियावर वॉच ठेवण्यासाठी स्वतंत्र सायबर विभाग आहे. यामुळे व्यक्त होताना दोन समाजात तेढ निर्माण होईल,कोणाचे मन दुखावेल, कोणाचा अवमान होईल, अशा पोस्ट करू नका. फसवणुकीपासून सावध राहा. समाज माध्यमात काही आक्षेपार्हय आढळल्यास त्यावर प्रतिक्रिया देण्याऐवजी सायबर सेलला माहिती द्या.
अमिषाला बळी पडू नका.
नांदगाव खंडेश्वर तालुक्यात सोशल मिडीयाच्या माध्यमातून फसवणूक केल्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे सोशल मीडियावरील कोणत्याही आमिषाला बळी न पडता चांगल्या कामासाठीच त्याचा वापर करावा. वादग्रस्त पोस्ट येत असलेल्या ग्रुपमधून एक्झीट व्हावे. बनावट नावाने सोशल मीडियावर अकाउंट काढून कोणाची बदनामी केल्यास कठोर कारवाई होऊ शकते.