नांदगाव खंडेश्वर/तालुका प्रतिनिधि.
शासनाने राबविलेल्या मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा अभियानात नांदगाव खंडेश्वर येथील मराठी माध्यमाची (सेमी इंग्लिश) एकलव्य गुरुकुल स्कूल ही शाळा सहभागी झाली होती. शासनाने ठरविलेल्या 30 निकषांमध्ये शाळा रंगरंगोटी,वृक्षारोपण, वर्ग सजावट, परसबाग,कौशल्य विकास कार्यक्रम, आर्थिक विकास कार्यक्रम ,आरोग्य तपासणी, किशोरवयीन मुलींसाठी विशेष मार्गदर्शन क्रीडा स्पर्धा आयोजन, व क्रीडा सहभाग, तंबाखू मुक्त शाळा, महावाचन चळवळ, प्लॅस्टिक मुक्त परिसर, बचत बँक, बाल संसद, वकृत्व स्पर्धा, गायन व निबंध स्पर्धा ,स्वच्छता मॉनिटर, हात स्वच्छ धुण्याच्या पद्धती, भौतिक सुविधा उपलब्ध, राष्ट्रीय एकात्मता सांस्कृतिक कार्यक्रम लोकसहभागातून देणगी उपलब्धता इ…. मुद्द्याने गुणांकन करण्यात आले. त्यामध्ये प्रथम केंद्र स्तरावरील टीमने मूल्यांकन केले. व नंतर तालुकास्तरावरून माननीय गटशिक्षणाधिकारी यांच्या टीमने मूल्यांकन ,,,,प्रत्यक्ष विद्यार्थ्यांच्या मुलाखती व सादरीकरण पाहून केले. हे अभियान (01जानेवारी 2024) ते (15फेब्रुवारी 2024) पर्यंत विविध उपक्रमाने राबविण्यात आले.
या उपक्रमामध्ये सर्व शाळांनी रजिस्ट्रेशन केले होते. परंतु प्रत्यक्ष ज्या शाळांनी उपक्रम राबविले त्याच शाळेचे मूल्यांकन करण्यात आले. त्यामधून एकलव्य गुरुकुल स्कूलचा तालुक्यातून प्रथम क्रमांक आला असे गटशिक्षणाधिकारी (पंचायत समिती)नांदगाव खंडेश्वर यांनी कळविले. एकलव्य गुरुकुल स्कूल नेहमीच विशेष उपक्रम राबवित असते. ज्यामध्ये उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण जिल्हा ते राज्यस्तर स्पर्धा आयोजन व राज्य राष्ट्रीय ,,,आंतरराष्ट्रीय स्पर्धा विद्यार्थी सहभागी करणे व विविध स्पर्धांचे आयोजन सराव वर्ग शाळेच्या वेळे व्यतिरिक्त घेऊन राबविणे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान विद्यार्थी पालक व व्यवस्थापनातील प्रतिनिधी माजी विद्यार्थी यांच्या सहकार्याने राबविण्यात आले. ज्यामुळे शाळे प्रति सर्वांमध्ये सहकार्याची भावना वृद्धिंगत व्हावी व शाळा स्वच्छ सुंदर व गुणात्मक दृष्ट्या वाढीस लागावी हा या अभियानाचा हेतू आहे. हे अभियान राबवीत असताना शाळेचे सर्व विद्यार्थी पालक व व्यवस्थापन समितीने सहकार्य केले. त्यामुळे एकलव्य गुरुकुल स्कूलचा प्रथम क्रमांक आला असे शाळेचे मुख्याध्यापक विलास मारोटकर व व्यवस्थापक अनुप काकडे यांनी सांगितले हे अभियान यशस्वीतेसाठी शाळेचे शिक्षक गजानन शेळके, पंकज खांडेकर, मोहित झोपाटे, स्वप्निल पाटील, सीमा पोहनकर, सुरेंद्र चौधरी, ईश्वर जाधव, अपर्णा चव्हाण, वैशाली मोरे, नीलिमा देवघरे गुंजन नेवारे, प्रीतम ठाकरे, मोनाली लाड, सविता सुने, रेखा पंचगडे, लतिका जुनघरे ,शुभांगी तऱ्हेकर,अश्विनी शिरभाते ,रेवती परसनकर,सुनीता मारोटकर, वैशाली भगत, श्रीकांत खांडेकर, प्रतीक्षा बोरेकर, पूजा ठाकरे, किशोर सूर्यवंशी प्रतीक्षा चव्हाणशिक्षकांनी शर्तीचे प्रयत्न केले विशेष मार्गदर्शक राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक सदानंद जाधव यांच्या मार्गदर्शनात अभियान राबविण्यात आले. तसेच अधीर कडू (राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक) व सेवानिवृत्त शिक्षक गजानन तऱ्हेकर, उत्तम मुरादे(शिक्षन तज्ञ) विशाल ढवळे (अध्यक्ष) एकलव्य अकादमी अमर जाधव (आंतरराष्ट्रीय धनुर्विद्या मार्गदर्शक) श्री. पवन जाधव व संस्थेचे पदाधिकारी व पालकांचे विशेष सहकार्य लाभले शाळेला मिळालेल्या प्रथम पुरस्काराबाबत शिक्षणप्रेमी व अधिकारी व गावकरी यांनी अभिनंदनचा वर्षाव केला…….!!!!