नांदगाव शहरातून निघाली जंगी रॅली.
विद्यार्थ्यांचे भव्य स्वागत.
नांदगाव खंडेश्वर/तालुका प्रतिनिधि.
नवी मुंबई येथे दि. ७ ते १० मार्च दरम्यान पार पडलेल्या राज्यस्तरीय तंत्र प्रदर्शनमध्ये आयटीआय गटातून नांदगाव खंडेश्वर आयटीआयने बाजी मारत प्रथम क्रमांक पटकाविला आहे. सदर विजयी प्रशिक्षणार्थी व निदेशक यांचे सोमवारी (ता. ११) नांदगाव खंडेश्वर शहरात आगमन होताच बस स्टँड चौकात फटाक्यांच्या आतिषबाजीत व ढोल – ताशांच्या गजरात जंगी स्वागत करण्यात आले. तसेच आयटीआय पर्यंत भव्य मिरवणुक काढण्यात आली. यामुळे नांदगाव खंडेश्वर शहर दुमदुमले होते. सदर यश प्राचार्य नंदनसिंह भुकवाल, वेल्डरचे शिल्पनिदेशक दिपक गिरी, रूपेश भुरे यांच्या मार्गदर्शनात प्राप्त केले.औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची (आयटीआय) तालुकास्तरीय तंत्रप्रदर्शनी काही दिवसांपुर्वी पार पडली.
यामध्ये संधाता (वेल्डर) व्यवसायाच्या प्रशिक्षणार्थ्यांनी तयार केले शेतकरी मित्र डवरणी, फवारणी व पेरणी यंत्राला प्रथम क्रमांक मिळून जिल्हास्तरावर निवड झाली होती. यानंतर जिल्हास्तरावर अमरावती येथील आयटीआयमध्ये झालेल्या तंत्रप्रदर्शनीमध्ये सुध्दा सदर शेतकरी मित्र यंत्राने प्रथम क्रमांक प्राप्त केल्याने या मॉडेलची राज्यस्तरावर निवड करण्यात आली. यानंतर नवी मुंबईमधील नेरूल येथील तेरणा इंजिनिअरींग कॉलेजमध्ये दि. ७ ते १० मार्चदरम्यान पार पडलेल्या डिपेक्स राज्यस्तरीय तंत्रप्रदर्शनीमध्ये नांदगाव आयटीआयचे शिल्पनिदेशक दिपक गिरी, रूपेश भुरे यांच्यासह प्रशिक्षणार्थी प्रतिक राऊत, सागर सैरिशे, खुशाल माळी, यज्ञेश मेटकर हे सहभागी झाले होते. यात आयटीआय गटात राज्यातून प्रथम क्रमांक शेतकरी मित्र यंत्राला मिळाला. सदर विजयी चमुंचे नांदगाव खंडेश्वर शहरात आगमन होताच आयटीआयचे शिल्पनिदेशक निरंजन मुरादे, राजेंद्र उन्होणे, तुषार जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत जंगी स्वागत करून खुल्या जीप मधून मिरवणुक काढण्यात आली.
यादरम्यान एकलव्य क्रिडा अकादमीचे संस्थापक सदानंद जाधव, शिवसेना (ठाकरे गट) चे माजी युवासेना जिल्हाप्रमुख प्रकाश मारोटकर यांनी सुध्दा भेट देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले. या कार्यक्रमाकरिता शिल्पनिदेशक संदीप तिरमारे, निलेश देऊळकर, राम इखार, सुशिल सरोदे, सागर डांगे, चिन्मय दहाट, प्रशांत पोच्ची, वैभव केणे, वैभव राऊत, शहजाद खान, रिना जुनघरे, मयुरी वसुले, रूचिका डोळस, संगिता बिबेकर, दिपाली लोखंडे, कर्मचारी अनंत खेडकर, निलेश खंडार, मनोज पकडे, गौरव मोगरे, रवि लेंडे, सुरक्षारक्षक धिरज तायडे, जयेश काटोलकर, धर्मदिप राणेकर, संगिता राऊत आदींची उपस्थिती होती.