विजय नाडे/नांदगाव खंडेश्वर.
तालुक्यातील माहुली चोर येथे ग्रा.प.च्या वतीने दि.१४ रोजी जागतिक महिला दिन व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मृतिदिन महिलान करिता विविध स्पर्धा घेवून मोठ्या उत्सहात साजरा साजरा करण्यात आला.गावातील महिलान मध्ये उत्साह निर्माण व्हावा तसेच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे विचार महिलान मध्ये रुजावे या उद्देशाने येथील सरपंचा संगीता झंझाट यांच्या पुढाकाराने येथील ग्रा.प.कार्यालयाच्या प्रांगणामध्ये जागतिक महिला दिन व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मृतिदिन साजरा करण्यात आला.
यावेळी महिलांन करिता रस्सीखेच,बास्केटबॉल,संगीत खुर्ची,उखाणे या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.या मध्ये दिपिका यादव, प्रिती कोकणे,वर्षा भागवत,लिला सरोदे, राणी येवतकर,गायत्री ओलीवकर,मीना तिखीले,सुरेखा जाधव,सारिखा सरोदे,रुपाली झंझाट, या महिलांनी पारितोषिक मिळवले.या वेळी मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता ग्रा.पं.सदस्या रत्ना गोतमारे,विभा ढगे ,सुधा जाधव,माधुरी मेश्राम तसेच देवयानी दाते,वनिता गादे,भारती ओलीवकर,वैशाली गाडेकर, अश्विनी खारोडे,अर्चना सरोदे,प्रीती सरोदे,ज्योती सरोदे,संगीता राऊत,वंदना भोसले,प्रियंका अळसपुरे, शुभांगी नाडे, पुष्पा गोमासे,अर्चना कोरडे,सुषमा झंझाट,निर्मला तिखीले,उमा भागवत,किरण भागवत,आम्रपाली गाडेकर, नूतन खंडारे,गंगा गाडेकर ,सुनिता पवार,अंकुश कोल्हे यांनी परिश्रम घेतले.