कार्यालयात नागरिकांना जाताना करावी लागते कसरत.
प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी.
नांदगाव खंडेश्वर/तालुका प्रतिनिधी.
नांदगाव खंडेश्वर येथे शासनाने करोडो रुपये खर्च करून अत्यंत देखनी आणि सुंदर अशी इमारत बांधलेली असून ही इमारत शहराच्या सौदर्य मध्ये भर घालत आहे परंतु या सुंदर आणि देखण्या इमारतीला नागरिकांच्या हेकेखोरपणा मुळे डाग लागण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.या इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वारा समोरच या कार्यालयात कामानिमित्त येणारे नागरिक हे आपली दोनचाकी वाहने उभी करत असून या इमारतीच्या अगदी समोरच मोठ्या प्रमाणात दोन चाकी वाहनाच्या रांगाचं रांगा दिसत असून या वाहनांमुळे नागरिकांना कार्यालयात जाताना अडचणीचा सामना करावा लागत असून तहसीलदार यांच्या शासकीय वाहनास उभे राहण्याकरिता सुद्धा जागा राहत नसल्याचे दिसून येते या प्रशस्त अश्या इमारतीमध्ये दोन चाकी आणि चार चाकी वाहन उभे करण्यासाठी वाहन उभे करण्याचे शेड उभारण्यात आलेले आहे परंतु हे दोन्ही शेड नेहमी खालीच दिसून येतात आणि मुख्य गेट समोर वाहनाच्या रागाचं रांगा दिसून येतात याला जबाबदार कोण ?
या वाहन उभे करण्याच्या नागरिकांच्या अतिरेकी पणामुळे ही इमारत विद्रूप दिसत असून तहसील कार्यालयांच्या आत मध्ये नागरिकांना जाताना त्रास होत आहे.
त्यामुळे नागरिकांच्या या अतिरेकी पणाला आळा घालण्यात येऊन या इमारती समोर वाहने उभी करण्यास मज्जाव करण्यात यावा आणि पार्किंग शेड मध्येच वाहने उभी करण्याची सक्ती नागरिकांना करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे ही वाहने इतक्या मोठ्या प्रमाणात उभी करण्यात येते की कधी कधी तहसीलदारांना सुद्धा आपल्या केबिन मध्ये जाताना त्रास सहन करावा लागतो त्यामुळे यावर वेळीच उपाय योजना करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.