ग्रामपंचायत हतबल.
गावात कचऱ्याचा ढीग,नाल्या तुडुंब भरल्या.
नवनिर्वाचित सरपंच गावकऱ्यांना न्याय देतील का?
नांदगाव खंडेश्वर/ तालुका प्रतिनिधी.
वाढोणा (रामनाथ)या गावात विविध विकास कामांवर कोट्यावधी रुपये खर्च झाले आहे .परंतु जिकडे तिकडे समस्यांचा डोंगर उभा आहे.त्यामुळे गावकऱ्यांना मरण यातना सहन कराव्या लागत आहे.याकडे सरपंच लक्ष देतील का असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.गेल्या अनेक वर्षापासून कोर्ट कचऱ्यात खुर्ची साठी भांडणे सुरू होते .आता खुर्ची जरी स्थिर असली परंतु विकास कामाचे काय होणार, की पुन्हा गाव भकास होणार. कारण सत्तारूढ सरपंच पण गावांसाठी काहीच करणार नसल्याचे शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख विष्णू तिरमारे यांनी म्हटले आहे .15 व्या वित्त आयोगाच्या निधी मधून स्थानिक ग्रामपंचायतीने लाखो रुपयांच्या कचरा पेट्या व घंटागाडी खरेदी केल्या आहेत. त्यासाठी कचरा साठविण्यासाठी सिमेंटचे टाके चे सुद्धा बांधकाम केलेले आहे. परंतु कचरा साठविण्याचे टाके शोभेची वस्तू बनली आहे .गेल्या अनेक वर्षापासून गावात कुठेच घंटागाडी फिरली नाही.
कचऱ्याच्या पेट्या जागोजागी सिमेंट काँक्रीट मध्ये फिट करण्यात आल्या आहे. परंतु त्यातील कचरा काढण्यासाठी ग्रामपंचायतकडे माणूस नाही. त्यामुळे कचरा पेट्या तुडुंब भरल्या आहेत .त्याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. गावात आणि गावाच्या बाजूला मोठमोठे खताचे ढिगारे लागलेले आहेत. जिल्हा परिषद हायस्कूलच्या जवळ वर्ग खोलीला लागूनच खताचा भला मोठा ढीग आहे. तिथून ग्रामपंचायत हाकेच्या अंतरावर आहे. परंतु आजपर्यंत ग्रामपंचायत न त्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही. खतावरचा कचरा उडून बाजूलाच असलेल्या हॉटेलमध्ये जात आहे. आणि तेच धुळीचे कण असलेले अन्नपदार्थ लोक खात आहे. गावातील संपूर्ण नाल्या तुडुंब भरलेल्या आहेत. नालीतील पाणी रस्त्यावर येत आहे.
नाल्या उपसण्याचे काम ग्रामपंचायत ने अद्यापही केलेले नाही. गावातील पिण्याच्या पाण्याची टाकी कधी साफ केल्या जाते हेही गावकऱ्यांना माहिती नाही. असा गलथान कारभार स्थानिक ग्रामपंचायतीचा आहे .नळाच्या पाईप लाईन साठी संपूर्ण गावातील सिमेंटचे रस्ते फोडण्यात आले होते. त्याची दुरुस्ती ग्रामपंचायत किंवा संबंधित विभागाने आतापर्यंत करायला पाहिजे होती परंतु सिमेंट रस्त्यावरील लोखंडी रॉड पूर्णता उघडे पडलेले आहे. रोज छोटे-मोठे किरकोळ अपघात रस्त्यावर होत आहे. पाण्याच्या टाकी पासून तर ते कारंजा रोड पर्यंतचा रस्ता हा पूर्णपणे उघडलेला आहे. वारंवार ग्रामपंचायतला सांगून सुद्धा आजपर्यंत रस्ता दुरुस्ती करण्यात आलेला नाही. बाजार चौक ते जैन मंदिर हा रस्ता मधातून खड्डा पाडून त्यामध्ये पाईपलाईन टाकण्यात आली आहे. आणि खड्ड्यावर थातूरमातूर मातीचा ढीग लावलेला आहे.
त्यामुळे वाहन चालवताना किंवा पायी चालताना नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते स्मशानभूमी हा दलित वस्तीतील रस्ता पूर्णपणे उखडला आहे . तीस हजार चौरस फुटाचा बाजार चौक आणि या चौकात 24 तास ट्रॅक्टर ट्रॉली चार चाकी वाहने बैलगाडी मळणी यंत्र आणि कचरा हे आपल्या निदर्शनास येते. बाहेरच्या लोकांना गाडी लावण्यासाठी या चौकामध्ये जागाच शिल्लक राहत नाही. परंतु यावर आजपर्यंत ग्रामपंचायतने कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली नाही. गावातला मुख्य चौक म्हणजे बाजार चौक आणि या चौकातून रोज शेकडो नागरिक ये जा करतात परंतु हा चौवकातच अतिक्रमणांच्या विळाख्यात अडकला आहे .गावाचा सौंदर्य म्हणजे शिवाजी पुतळा या पुतळ्याच्या आजूबाजूलाही अतिक्रमणाने वेडले आहे. आठवडी बाजार दर सोमवारी गावात भरतो. परंतु गावात बाजार भरण्यासाठी जागा अपुरी पडत आहे .दरवर्षी ग्राम पंचायत बाजाराचा हर्रास करतो.
त्यातून लाखो रुपये उत्पन्न ग्रामपंचायतीला आहे. परंतु बाजारासाठी ग्रामपंचायत ने कोणत्याही सोयी सुविधा उपलब्ध करून दिलेल्या नाही. वाढोना रामनाथ ते तारखेला रस्ता मंजूर झाल्याचे सांगतात. परंतु आजपर्यंत ही या रस्त्याचे काम सुरू झालेले नाही. जिल्हा सिमेच्या वादात अडकलेला वाढोना ते मेहा हा रस्त्याला अजून किती वर्ष लागेल हाही प्रश्न आहे. लहान दोनच ते वाढोना या पांदण रस्त्यावर लाखो रुपये खर्च करण्यात आले आहे .परंतु या रस्त्याने बैलबंडीही चालवता येत नाही . असे शेतकरी सांगतातm वाढोना ते पिंपळगाव निपाणी पांदण रस्त्याची अशीच स्थिती आहे . गावात ग्रामपंचायतच्या मालकीच्या तीन पाणीपुरवठ्याच्या विहिरी आहे. तीन पाण्याच्या भल्या मोठ्या टाक्या आहेत.संपूर्ण गावात पाईपलाईन आहे. ग्रामपंचायत जवळ पाणी सोडण्यासाठी कर्मचारी आहे .एवढं सगळं असतानाही आठवड्यातून फक्त एकच दिवस नळाला पाणी येतं असं विदारक चित्र येथे निर्माण झाले आहे. गावाचा विकास दिवसेंदिवस भकास होत चाललेला आहे. याकडे कोणत्याही पदाधिकाऱ्यांचे लक्ष राहिले नसल्याचा आरोप गावकऱ्यांनी केलेला आहे. सरकारी दवाखान्याला 24 तास कुलूप दिसते .डॉक्टर कधी येतो आणि कधी जातो हे गावकऱ्यांना माहिती नाही. पशु दवाखान्यांमध्ये गेल्या वर्षभरापासून डॉक्टर बेपत्ता आहे .वारंवार पशुसंवर्धन विभागाला विनंती केल्यानंतरही डॉक्टर उपलब्ध होऊ शकले नाही.
गावातील रस्त्यासाठी पाच लाखाची तरतूद केली आहे.नाल्या सफाई व कचरा गोळा करण्यासाठी माणूस भेटत नाही.इलेक्ट्रिक घंटा गाडी खरेदी करण्याचे प्रस्तावित करण्यात आलेले असून लवकरच त्याला मंजुरात मिळेल.
राजेंद्र वाघोडे.(ग्रामविकास अधिकारी.)