महिला दिनानिमित्त कर्तुत्वान महिलांचा सन्मान.
अतुल्य भारत विचार मंच.आणि पॉवर ऑफ मीडियाचा संयुक्त उपक्रम.
नांदगाव खंडेश्वर/तालुका प्रतिनिधी.
शिवरायांच्या स्वराज्य स्थापन करण्यामागील प्रेरणा असणाऱ्या माता जिजाऊ,स्वातंत्र्याची चेतना देणाऱ्या राणी लक्ष्मीबाई आणि स्त्री शिक्षणासाठी झटणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या सर्व स्त्रियांच्या कार्यापासून प्रेरणा घेऊन त्यांना मानवंदना देणारा वर्षातील सर्वोत्तम दिवस म्हणजे जागतिक महिला दिवस होय.त्या निमित्याने नांदगाव खंडेश्वर येथे अतुल्य भारत शैक्षणिक विचार मंच आणि पॉवर ऑफ मीडिया फाउंडेशन यांचे वतीने सावित्रीच्या लेकींचा गौरव करण्यात आला ही तालुक्याकरिता अत्यंत अभिमानाची बाब असून हा तालुक्यातील पहिलाच असा कार्यक्रम आहे ज्या ज्या महिलांना आज सन्मानित करण्यात आले त्या महिलांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन त्यांचा वसा पुढे न्यावा असे प्रतिपादन नांदगाव खंडेश्वर येथील तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी यांनी केले.ते अतुल्य भारत सामाजिक शैक्षणिक विचार मंच आणि पॉवर ऑफ मीडिया फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनाच्या पर्वावर सावित्रीच्या लेकीचा गौरव समारंभात अध्यक्ष स्थानावरून बोलत असताना व्यक्त केले.
या कार्यक्रमामध्ये तालुक्यातील आठ कर्तुत्वान महिलांचा शाल,श्रीफळ आणि सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला त्यामध्ये आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिला डॉ.प्रविना देशमुख, सामाजिक कार्यकर्त्या सौ.रुपाली नाकाडे,सौ.रंजना वानखडे,जि.प.शिक्षिका सौ. सुनिता राऊत,प्रथम नगरसेविका इंजिनशा भोसले प्रगतीशील शेतकरी सौ.नीताताई सावदे एड.रेखा साखरे,आंतरराष्ट्रीय धनुर्विद्या खेळाडू कु.साक्षी तोटे यांना सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन नांदगाव खंडेश्वर येथील एकलव्य धनुर्विद्या अकादमीच्या योग भवनात आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन नांदगाव खंडेश्वर येथील गटशिक्षणाधिकारी सौ. प्रमिला शेंडे यांनी केले.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून नांदगाव खंडेश्वर येथील नायब तहसीलदार करिष्मा वासेकर,गटविकास अधिकारी संजय झंझाट,महिला व बालविकास अधिकारी वीरेंद्र गलफट,राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक सदानंद जाधव,अतुल्य भारत विचार मंचाचे अध्यक्ष राजेश कडू,सामाजिक कार्यकर्त्या मृदुला मॅडम,अय्युब शहा,मुख्याध्यापिका सौ. वंदना सरोदे,सौ.दिपाली धवणे, सौ.सुरेखा लोथे,पत्रकार उत्तम ब्राह्मणवाडे,तालुका अध्यक्ष श्रीपाल सहारे आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीला आयोजकांच्या वतीने उपस्थित सर्व प्रमुख अतिथीचा मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेश कडू,संचालन सौ.अश्विनी जुनघरे तर आभार प्रदर्शन सौ.माधवी थोरात यांनी केले या कार्यक्रमाला तालुक्यातील महिलांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती.या कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता सौ.रंजना वानखडे,सौ.करुणा चव्हाळे,सौ.आकांक्षा कडू, सौ.कविता देवळे,सौ.भाग्यश्री दुधे,पत्रकार प्रशांत झोपाटे,उमेश चव्हान,पवन ठाकरे,नितेश कानबाले,रमेश गंजीवाले,योगेश राऊत,प्रवीण शहाडे इत्यादींनी अथक प्रयत्न केले.
मी सावित्री बोलतेय एकपात्रीचे आयोजन.
या कार्यक्रमानंतर प्रख्यात कलावंत सौ.प्रतिभा कांबळे यांच्या मी सावित्री बोलतेय या एकपात्री प्रयोगाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व महिलांनी भर भरून दाद दिली यावेळी आयोजकांच्या वतीने त्यांचा सुद्धा शाल, श्रीफळ आणि सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांना मतदान करण्याची शपथ देण्यात आली आणि राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.