महाशिवरात्रीनिमित्त श्री हरिहर मंदिर संस्थान येथे भाविकांची मोठी गर्दी.
नांदगाव खंडेश्वर/उत्तम ब्राम्हणवाडे.
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शिरपूर या गावी 224 वर्ष पुरातन जागृत श्री महादेव देवस्थान आहे. दरवर्षी महाशिवरात्रीनिमित्त येथे देवाच्या दर्शनाकरिता भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते. या संस्थानावर मोठ्या प्रमाणात यात्रा भरती व हजारो भाविक भक्तांना महाप्रसाद वाटप केला जातो..सन 1800 पासून श्री महादेव मंदिर शिरपूर येथे स्थिर आहे. मुख्याध्या म्हणजेच मंदिराला लागूनच त्रिवेणी संगम आहे या संघामध्ये बेंबळा नदी जडून नदी व चांदणी नदी या नद्याचा, एकत्र होऊन येथे संगम निर्माण होतो. या संगमावर हे महादेवाचे लिंग शिरपूर येथील स्व. मुरारजी पाटील पुसदकर यांना प्राप्त झाले होते. त्यांनी सन 1800 मध्ये हे लिंग स्थापन केले.
मुख्य म्हणजे त्या इंग्रज राजवटीमध्ये इंग्रजांनी हैदराबाद रेसिडेन्सी 1870 मध्ये 1 एकर 24 गुंठे जमीन मंदिरा करिता आदेशाद्वारे मंदिराला दिली. तसेच या मंदिराच्या जमिनीमध्ये सन 1904 मध्ये भव्य स्वरूपात यज्ञ करण्यात आले होती. सांगण्यानुसार यज्ञामध्ये उरलेल्या साहित्य विकून त्याकाळी आठशे रुपयात मंदिराचे बांधकाम करण्यात आले होते. भाविकांच्या सांगण्यानुसार एका काडी मंदिरामध्ये देवाच्या लिंगा वरती त्रिवेणी संगमाचा पूर जाऊन सुद्धा मंदिराला कुठलाच प्रकारचे नुकसान झालेले नाही व आज हे मंदिर स्थिर उभे बघायला मिळते..