लाभ केव्हा मिळणार याकडे ग्रामस्थांचे लक्ष.
नांदगाव खंडेश्वर/तालुका प्रतिनिधी.
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील ग्रामपंचायत अडगाव बु येथे ग्रामसभा घेण्यात असता गावातील प्रपत्र ड मध्ये असणाऱ्या सर्वच लाभार्थीना मोदी आवास योजनेंतर्गत लाभार्थी यांची निवड असल्या बाबतची सुचना लाभार्थी पर्यंत न पोहचल्या मुळें ग्रामसभेत फक्त ११नागरिकाच्या उपस्थित मध्ये विषेश ग्रामसभा घेण्यात आली परंतु ग्रामसभेतच प्रोसिडिग न लिहल्याने काही पात्र लाभार्थी यांच्या वर अन्याय होण्याची शक्यता आहे कारण पात्र लाभार्थी वंचित ठेऊन आपल्या सोयीचे लाभार्थी ठरावा मध्ये लाभार्थी निवड करण्याचा उद्देश ग्रामसेवक व सत्ताधारी पद अधिकारी यांचा दिसत आहे त्यामुळे आज रोजी पर्यंत पंचायत समिती मध्ये पात्र लाभार्थी यांचा ग्रामसभेचा ठराव पंचायत समिती नांदगाव खंडेश्वर येथे सादर करण्यात आला नाही.
ठराव सादर करण्या करीता व पात्र लाभार्थी यांना वंचित ठेवण्याचा हेतु ग्रामसेवकाचा दिसत आहे त्याना वार वार लेखी पत्र व तोंडी सुचना देऊन सुद्धा ग्रामसेवक यांच्या कामामध्ये सुधारणा झाली नाही व लाभार्थी यांना वेळेत लाभ मिळावा त्या उद्देशाने काम करत नाही ते स्वताच दुर्लक्ष करत असल्याने पात्र लाभार्थी घरकुल पासून वंचित राहू नये अशी मागणी गटविकास अधिकारी पंचायत समिती नांदगाव खंडेश्वर तसेच प्रकल्प संचालक अमरावती व वरिष्ठांना माझ्या वार्ड मधील लाभार्थी वंचित राहू नये यासाठी गावातील लाभार्थी व आम्ही ग्रामपंचायत सदस्य सौ कल्यानी जगदिश दिवटे सदस्य ग्रामपंचायत आडगाव बु प्रफुल्ल सागराव परीमल सदस्य ग्रामपंचायत अडगाव बु मंगेश मारोतराव परीमल सदस्य ग्रामपंचायत अडगाव बु नबाबसिग भाऊराव मोहोड जलसेवक अडगाव बु आशिष भास्कराव दिवटे इतर गावांतील घरकुल पासून वंचित राहिले लाभार्थी हे करणार असल्याचे त्यांनी सांगितले.