ग्रामपंचायत ने घेतले झोपेची सोंग.
गावात जिकडे तिकडे अस्वच्छता.
नांदगाव खंडेश्वर/ तालुका प्रतिनिधी.
भारत सरकारच्या स्वच्छ भारत अभियानाचा पूर्णतः फज्जा उडविण्याचे काम काही ग्राम पंचायती करीत असून यांचा ज्वलंत नमुना म्हणजे नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील वाढोणा (रामनाथ) येथील ग्राम पंचायत होय या गावात स्वच्छता केवळ कागदावरच मर्यादित राहिली असल्याचे दिसून येत आहे गावातील बाजारपेठेत कुजलेला कचरा, जिकडे तिकडे अस्वच्छता आणि भाजीपाल्याचे फेकलेले तुकडे दिसून येतं आहेत यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. आणि ग्राम पंचायतच्या कामचोर स्वच्छ्ता कर्मचाऱ्यांमुळे बाजारपेठेमध्ये घाणीचे साम्राज्य पसरले आहे.
त्यामुळे या गावामध्ये सर्विकडे डास,मच्छर,आणि रोगराईचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे याकडे ग्रामपंचायत सरपंच आणि सचिव यांनी जातीने लक्ष देण्याची मागणी बाजारपेठेतील दुकानदारांनी केली आहे.या बाजापेठेत ग्राम पंचायतीने केरकचरा साठवण्यासाठी कुठेही डस्टबिनची सोय बाजारपेठमध्ये केली नसून त्यामुळे व्यापारी लोक कुजलेला भाजीपाला तेथेच टाकून देत आहेत.नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील ग्रामीण भागात स्वच्छ भारत अभियानाच्या नियमाकडे कोणीच लक्ष देत नसल्याचे दिसून येत असून याकडे तालुक्यातील सर्वच ग्राम पंचायतीचे दुर्लक्ष होत असून सरपंच सचिव हे फक्त कागदी घोडे नाचवित असल्याचे दिसून येते.
वाधोना रामनाथ येथील बाजारपेठेमध्ये व्यापाऱ्यांना भाजीपाला साठविण्याकरीता डस्टबिनची व्यवस्था ग्रामपंचायतीने करून देण्याची मागणी व्यापारी वर्गाने केली आहे .