नांदगाव खंडेश्वर/तालुका प्रतिनिधी.
स्व.बहिणाबाई भा.गावंडे बहुउद्देशिय संस्था , डॉ.पंजाबराव देशमुख गौमाता गौरक्षण ट्रस्ट, श्री रामनवमी उत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने मंगरूळ चव्हाळा येथे रक्तदान शिबीर संपन्न झाले.
शिबिराच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत डॉ.बाबासाहेब आंबेडकर, शिक्षणमहर्षी डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. एक सामाजिक उपक्रम आपण राबविला पाहिजे ही प्रेरणा घेऊन रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. ग्रामीण भागातील तरुणांना रक्ताचे महत्व अश्या शिबिराच्या माध्यमातून माहिती होते.
या शिबिराला बालाजी रक्त संकलन केंद्र अमरावती यांनी रक्तसंकलन केले. हे शिबीर मोठ्या उत्सहात पार पडले.
शिबीर यशस्वी होण्यासाठी मनोज गावंडे , अमित सावदे, वैभव भोयर , रोहन सावदे , अंकुश गाढवे , राजेंद्र सावदे , मनीष काटे इत्यादिंनी सहकार्य केले.