आरोग्य सेवक राजेंद्र चकुले यांचा करण्यात आला सत्कार.
नांदगाव खंडेश्वर/तालुका प्रतिनिधी.
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील प्रा आ केंद्र सातरगांव अंतर्गत दाभा उपकेंद्राचे आरोग्य सेवक राजेंद्र चकुले यांनी शासनाची आयुष्मान भव योजनेचा लाभ जास्तीत जास्त जनतेला मिळावा म्हणून आवश्यक असलेले गोल्डन कार्ड काढण्यासाठी दाभा व खीरसाना उपकेंद्र अंतर्गत परिसरातील विविध गावांना जनतेच्या गरजेनुसार कॅम्प घेऊन 1000 लोकांना गोल्डन कार्ड काढून दिले. त्यामध्ये आजारी लोकांच्या घरी जाऊन, राहिलेल्या लोकांच्या घरोघरी जाऊन कधी रात्री चे कॅम्प घेऊन कधी सकाळी अशा रीतीने जनतेचा वेळ न घेता मजुरी पडू न देता कार्ड काढून देण्याचे काम केले.
नुकतेच 1000 वे कार्ड काढतांना तालुका आरोग्य अधिकारी डॉ स्वप्नील मालखेडे साहेब महिला बाल विकास अधिकारी श्री वीरेंद्र गल्फट साहेब आरोग्य सहाय्यक श्री राजू मेश्राम हे स्वतः उपस्थित होते.
राजेंद्र चकुले यांचे जनतेप्रति केलेले कार्य पाहून मा गटविकास अधिकारी प्रकाश नाटकर व पत्रकार उत्तम ब्राम्हणवाडे यांचे उपस्थितीत विकसित भारत सकल्प यात्रे निमित्ताने गाव सावनेर येथे सरपंच्या श्रीमती अर्चनाताई ठाकरे यांचे हस्ते पुष गुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. या यात्रे निमित्ताने सावनेर गावातील 24 लोकांचे कार्ड काढून देण्यात आले
राजेंद्र चकुले यांनी याप्रसंगी जनतेला पाणी वाचवण्याचे महत्व झाडे लावण्याचे महत्व सांगून टीबी व आयुष्मान भव कार्डाची माहिती देऊन टीबी हारेगा देश जितेंगा चा नारा दिला.
जनता स्वतःही मोबाईल वरून कार्ड काढू शकतात परंतु प्रत्येकाजवळ अँड्रॉइड मोबाईल नसणे अँप्लिकेशन घेऊन कार्ड काढण्याचे पुरेसे ज्ञान नसणे त्यामुळे प्रशासनाच्या आदेशावरून राजेंद चकुले यांनी घरोघरी व गावोगावी जाऊ कार्ड काढून दिल्याने जनतेचा वेळ व पैसाही वाचवण्याचे काम आरोग्य सेवक राजेंद्र चकुले यांनी केले