रोहिणी खडसे,रोहित पाटील यांची प्रमुख उपस्थिती.
नांदगाव खंडेश्वर/उत्तम ब्राम्हणवाडे.
युवा संघर्ष यात्रेदरम्यान नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील फुबगावमध्ये आमदार रोहित दादा पवार यांनी नागरिकांशी संवाद साधला आणि युवा संघर्ष यात्रेमागील भूमिका स्पष्ट केली. सध्या राज्यात युवांपासून वेगवेगळ्या घटकांना कशा अडचणीला सामोरं जावं लागतं आणि या अडचणी सोडवण्याची जबाबदारी असूनही राज्य सरकार याकडं कसं दुर्लक्ष करतं, ही बाब जनतेसमोर मांडली.
त्याचसोबत तालुक्यातील शेतकरी आणि युवकांचे प्रश्न धारेवर घेऊन सरकारला खडे बोल सुनावले. स्थानिक जनतेला नांदगाव फुबगाव फाटा ते वाघोडा या रस्त्यासंबंधी विचारपूस करून स्थानिक लोक प्रतिनिधींना सुद्धा प्रश्न उपस्थित केले. यावेळी युवा संघर्ष यात्रेच्या 4 डिसेंबर नांदगाव खंडेश्वर ते फुबगाव या पायदळ यात्रा दरम्यान विशेष उपस्थिती राष्ट्रवादी महिला प्रदेश अध्यक्षा रोहिणीताई खडसे यांची होती, ताईंनी यावेळी सभेला संबोधित करताना आज उद्भवलेल्या शेती, महागाई, बेरोजगारी अशा विविध विषयांवर संबोधित केले.
सभेची प्रस्तावना मांडताना राष्ट्रवादीचे हितेश शेळके यांनी युवा संघर्ष यात्रेच्या निमित्याने नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील युवकांच्या समस्यांचा पाढाच आमदार रोहित दादा पवार यांच्या पुढे वाचला यावेळी माजी आमदार प्रा वीरेंद्र जगताप, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणीताई खडसे, रोहित पाटील, विकास लवांडे, राज राजापूरकर, पंकज नाना बोराडे, हेमंत देशमुख, रायुकॉ चे तालुकाध्यक्ष मनोज गावंडे, राकॉ तालुकाध्यक्ष सुरेश कहाते, साजिद भाई, संगीताताई ठाकरे, सम्राट डोंगरदिवे, सुधीर राऊत, किशोर भेंडे, प्रवीण भेंडे, अमोल शिरभाते, मोहन चोरे, किशोर गुलालकरी, धनराज रावेकर, हितेश शेळके, आनंद पाटील, जयकुमार शेळके, सोमेश्वर शेळके, सूरज लाडेकर, काँग्रेसचे अक्षय पारसकर, अमोल धवसे, यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते, युवा, महिला भगिनी आणि नागरीक उपस्थित होते.