डॉ बाबासाहेब आंबेडकर.
यांच्या अस्थिकलश भव्य रॅलीचे आयोजन.
ता.प्रतिनिधी/नांदगाव खंडेश्वर.
विश्वरत्न भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परम पूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त साधून तालुक्यातील नांदगाव खंडेश्वर बौद्धविहार येथून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी कलश व भव्य रॅलीचे आयोजन (दि.६) करण्यात आले होते.हि यात्रा नांदगाव खंडेश्वर येथील दाभा,चांदुर रेल्वे, धामणगाव व पुलगांव ठिक ठिकाणी मार्गक्रमण करत आली असता अस्थी कलशाचे बौद्ध बांधवांना दर्शन घेतले.सकळी ११ वाजता सुरू झालेली ही यात्रा १ वाजता चांदूर रेल्वे,३ वाजता धामणगाव रेल्वे,४ वाजता पुलगाव,५ वाजता देवगाव ( तळेगांव),शेवटी ६ वाजता येवती येथे पोहचली. या यात्रेकरीता नागपूर वरून अस्थीसोबत भन्ते मानव व गौरव रहाटे उपस्थित होते.
आयोजकामधून नांदगाव खंडेश्वर येथून सुधाकर डोंगर, सुधाकर इंगोले, किरणभाऊ रहाटे, मधुकर शेलारे, प्रदिप थोरात , सतिश सावध, गौरव रहाटे, रितीका कि.रहाटे, सुधाकर मंडवधरे, संजय वानखडे, भाग्यशिल वानखडे, सुरेश देवरे , शेषराव खडसे, श्याम तामगाडवे यांनी परिश्रम घेतले तर पुलगांव येथून सिद्धांर्थ डोईफोडे, अंकुश कोचे ,दिपक फुजादे, अमोल कोल्हे,उल्हार भरणे यांनी परिश्रम घेतले, तालुक्यातील चांदूर रेल्वे येथून सिद्धार्थ कांबळे, रवि नाईक, अविनाश पाटील, रमाई महिला मंडळ, मुकुंद भगत, दिशा शिरसाट, प्रेमचंद अंबादे, सिद्धार्थ चिटे , जगदिश गंदे, विशाल चव्हाण, अनिल आठवले, विलास आठवले, अरविंद वानखडे, चंदु उके, नानासाहेब डोंगरे, भारत गेडाम, बंडू आठवले, नितीन ढोके, चरणदास भार, सुनिल ढोकणे तसेच सुजाता महिला बचत गट इ.आयोजकांनी सहभाग घेऊन परिश्रम घेतले.
तसेच धामणगांव रेल्वे येथून अनिल डोंगरे, यशवंत बोरकर, शालीकराव कवाडे, सुरेश वानखडे, विजय लोखंडे कोमल राऊत , सचिन मुल, रामदास हाडे, सुनिता कवाडे, जयमाला लोखडे, विद्या बोरकर , राहूल गायकवाड, विलास बोरकर , उमेश लभाने , संजय गणीकर, प्रमोद बनसोड, कल्पना शेंडे, शालीनी ढोले, सुधाकर तोकसे , दिलीप उके तसेच महिला मंडळ समता सैनिक दल यांनी परिश्रम घेतले.