दोन्ही संघ अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेकरिता पात्र.
अमरावती/वृत्तसंस्था
नुकत्याच अण्णा विद्यापीठ, चेन्नई येथे संपन्न झालेल्या दक्षिण पश्चिम विभाग आंतर विद्यापीठ योगासन स्पर्धेत संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे पुरुष आणि महिला संघ सहभागी झाले होते. अतिशय चुरशीच्या झालेल्या या स्पर्धेत आपल्या उत्तम प्रदर्शनाच्या आधारे दोन्ही संघांनी प्रतिस्पर्धी संघाला मात देत पात्रता फेरी गाठली. महिला संघाने 5 वें स्थान तर पुरुषांच्या संघाने 11 वे स्थान प्राप्त केले. या संघाला मार्गदर्शक म्हणून डॉ. नितीन काळे, डी.सी.पी. ई. अमरावती, भाग्यश्री कानडे, अमरावती तर व्यवस्थापक म्हणून डॉ.वसिष्ठ खोडस्कर नेहरू महाविद्यालय, नेर परसोपंत यांनी उत्कृष्ट सेवा दिल्यात.
दोन्ही संघाने प्राप्त केलेल्या या घवघवीत यशाबद्दल कुलगुरू डॉ. प्रमोद येवले, प्र कुलगुरू डॉ. प्रसाद वडेगावकर, कुलसचिव डॉ. तुषार देशमुख, क्रीडा संचालक डॉ. अविनाश असनारे आणि क्रीडा मंडळाच्या सर्व सदस्यांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्यात.