चित्ररथाच्या माध्यमातून नागरिकांना देण्यात आली योजनेची माहिती.
मोखंड व सावनेर ग्रामवासीयांनी घेतला मोठ्या प्रमाणात लाभ.
नांदगाव खंडेश्वर/ उत्तम ब्राम्हणवाडे.
.विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून 15 नोव्हेंबर 2023 पासून 26 जानेवारी 2024 पर्यंत तालुक्यातील संपूर्ण गावांना भेटी देणार आहे. संकल्प यात्रेचा विकास रथ आज ग्रामपंचायत मोखड आणि सावनेर या गावांना भेट देऊन नागरिकांना केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनेची माहिती देण्यात आली.या संकल्प यात्रेच्या माध्यमातून गावातील गरजू लाभार्थ्यांना योजनेची संपूर्ण माहिती व मार्गदर्शन या यात्रेच्या माध्यमातून करण्यात आले.
यामध्ये शुगर तपासणी टीबी तपासणी सिकलसेल आजार तपासणी आयुष्यमान भारत कार्ड इत्यादी आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रकाश नाटकर यांनी केले असून राबविण्यात येणाऱ्या योजनांची सविस्तर माहिती ग्रामस्थांना दिली. तालुकास्तरावरील विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते. विकसित भारत बनविण्याची सामूहिक शपथ घेऊन संकल्प करण्यात आला. गावातील सर्व गरजू लाभार्थींनी योजनेची माहिती घेतली.
घेऊन लाभ घ्यावा असे आवाहन गटविकास अधिकारी प्रकाश नाटकर यांनी यावेळी केले.यावेळी विस्तार अधिकारी विठ्ठल जाधव , बंडू घुगे,कृषी अधिकारी लक्ष्मण खांडरे बालविकास प्रकल्प अधिकारी वीरेंद्र गलफट,पत्रकार उत्तम ब्राम्हणवाडे, केंद्र प्रमुख कल्पना ठाकरे,सचिव लीना लोंदे ,निलेश भुसारी,तालुका व्यवस्थापक गजानन देऊळकर उपस्थित होते.संकल्प यात्रेमध्ये ग्रामपंचायत मोखड व सावनेर येथे चित्ररथा मधून योजनेची माहिती देण्यात आली. कार्यक्रमास मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थ व महिला उपस्थित होते.