अनेकांनी घेतला शिबिराचा लाभ.
नांदगाव खंडेश्वर /तालुका प्रतिनिधी
पशु संवर्धन विभाग व विकसित भारत अभियान अंतर्गत नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मौजे मोखडं येथे पशु वंधत्व शिबीर चे आयोजित करण्यात आले होते सदर शिबिरात गावातील माजावर न येणाऱ्या तसेच गाभण न राहणाऱ्या गायी व म्हशी वर उपचार करण्यात आले.
पशुधन विकास अधिकारी पशु वैदकीय दवाखाना नांदगाव डॉ अतुल खेरडे यांनी उपचार केले सदर शिबिरात डॉ गजानन मेश्राम, पशुधन विकास अधिकारी विस्तार पंचायत समिती नांदगाव उपस्थित होते तसेच सदर शिबिराचे उदघाटन सरपंच, उपसरपंच, गट विकास अधिकारी, गावातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते सदर शिबिरात श्री वसंत राठोड, पंकज पवार यांनी सहकार्य केले पशु वंधत्व शिबीर तालुक्यात सर्व गावात राबविण्यात येणार असून दिनांक 21-11-23ते 19-12-23 पर्यंत आहे