69 प्रकरणाचा करण्यात आला निपटारा.
दिवानी व फौजदारी न्यायालय आणि पंचायत समितीचा संयुक्त उपक्रम.
नांदगाव खंडेश्वर/उत्तम ब्राम्हणवाडे.
पंचायत समिती नांदगाव खंडेश्वर व दिवानी व फौजदारी न्यायालय नांदगाव खंडेश्वर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 9 डिसेंबर 2023 रोजी राष्ट्रीय लोक अदालतचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ग्रामपंचायत करसुलीची जुन्यात जुनी थकीत करधारकांची प्रकरणे दाखल करावयाची होती.यामध्ये तालुक्यातील 41 ग्रामपंचायतींनी थकबाकीदारांची 2572 प्रकरणे दाखल करण्यात आली होती. लोक अदालत सुनावणी दरम्यान वरीलपैकी 69 प्रकरणे निकाली निघाली असून त्यामध्ये 2,22,096 रुपये वसुली झाली. राष्ट्रीय लोक अदालत च्या माध्यमातून थकबाकीदारांची प्रकरणी निकाली निघत असून ग्रामपंचायत कर वसुली होत आहे.
सदर लोक अदालत कार्यक्रमास सतीश गायकवाड न्यायाधीश दिवानी व फौजदारी न्यायालय नांदगाव खंडेश्वर तथा अध्यक्ष तालुका विधि सेवा समिती, नांदगाव खंडेश्वर तसेच युनूस सर पॅनल मेंबर गटविकास अधिकारी प्रकाश नाटकर गटशिक्षणाधिकारी प्रमिला शेंडे विस्तार अधिकारी विठ्ठल जाधव सुनील खेडेकर कमल धुर्वे तालुक्यातील सचिव ग्रामपंचायत कर्मचारी व पंचायत समिती मधील सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. यावेळी शंभर टक्के कर वसुली करणेबाबत ग्रामसेवकांना गटविकास अधिकारी यांनी निर्देश दिले.