शेतातील पीक झाले उद्ध्वस्त.
हताश शेतकऱ्याने शेवटी फिरवला पिकावर ट्रॅक्टर.
नांदगाव खंडेश्वर/ उत्तम ब्राह्मणवाडे.
नांदगाव खंडेश्वर येथून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर असलेल्या मोखड येथे सतत्तच्या ढगाळ वातावरणामुळे हरभरा,कपाशी. तूर पीक धोक्यात आले असून तुरीच्या तुराट्या झाल्या तर कपासी मातीमोल झाली असून हरभरा पिकावर मर रोग आला असून दोन वेळा फवारणी करूनही हरभरा पीक सततच्या पाऊस व दूषित वातावरणामुळे भाजल्या सारखे झाले आहे.
मोखड येथील शेतकरी गोपाल वासुदेव गुल्हाने यांचे शेत सर्वे न 99/1इ मधे हरभरा पेरणी केली पीक चांगले भरदार आले परंतु निसर्गाची आवकृपा सतत पाऊस व दूषित वातावरणामुळे पिकावर मर रोग आला.
दोन फवारणीही केली परंतु पीक सोकत असून शेतक्याचा लागलेला खर्च पाण्यात गेला शेवटी सदर शेतकऱ्याने गहू पेरणीच्या उद्देशाने हरभरा पिकात टेकटर फिरवला असून अशी परिस्थिती तालुक्यातील हरभरा. कपाशी तूर उदपाधकावं वर आली असून शेतकऱ्यांनी समदीत विभाग तहसीलदार कृषी विभाग यांना निवेदन देण्यात आले मोबदला देण्याची मागणी करण्यात आली आहे