नांदगाव खंडेश्वर/उत्तम ब्राम्हणवाडे.
मंगरूळ चवाळा येथे रात्री मुक्कामी असलेली एस टी बस रात्री आपल्या वेळेवर मंगरूळ चवाळा येथे आली वाहक व चालक यांनी ग्रामपंचायत समोर गाडी उभी केली व आराम करण्यासाठी ते ग्रामपंचायत मध्ये गेले व रात्री गाडी मधून टाकी खाली होई पर्यंत डिझेल चोरी गेले आहे महत्वाची बाब मंगरूळ चवाळा येथे जेथून चोरी झाली त्या हाकेच्या अंतरावर असलेल्या पोलीस स्टेशन असून सुद्धा गावात चोरीची प्रमाण वाढत आहे.
तरी मंगरूळ चवाळा येथे गेल्या बऱ्याच चोरीच्या घटना घडत आहे जर असेच चोरीचे प्रमाण वाढले तर मंगरूळ चवाळा हे नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील सर्वात मोठे गाव दोन नंबर वाल्याच्या अड्डा झाल्याशिवाय राहणार नाही असे चित्र दिसत आहे एकतर गावात बाजार पेठ कमी होताना दिसत आहे तसेच गावात बाहेर गावातील लोक कमी येत आहे.
जर अश्या घटना घडल्या तर मंगरूळ चवाळा येथे येणारी मुक्कामी एस टी बस गावात येणार नाही असे वाटत आहे तरी पोलीस प्रशासन यांनी गेल्या काही दिवसापासून जे रात्री मंगरूळ चवाळा येथे पेट्रोलिंग जी बंद आहे ति सुरु करावी व अश्या होणाऱ्या घटना याची सखोल चौकशी करावी हि गावकरी मागणी करीत आहे.