नांदगाव खंडेश्वर/ उत्तम ब्राम्हणवाडे.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ सलग्नीत कला महाविद्यालयामध्ये राष्टीय सेवा योजना विभागाच्या वतीने रेडरिबन क्लब अंतर्गत एड्स जनजागृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते .
या कार्यशाळेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री सचिन वानखडे (समुपदेशक ग्रामीण रुग्णालय , नांदगाव खंडेश्वर) उपस्थित होते. “एड्स जनजागृती ” या विषयावर बहुमोल मार्गदर्शन त्यांनी केले. तसेच वाढोणा (राम.) नगरी मध्ये एड्स जनजागृती रली काढण्यात आली.
त्यानंतर महाविद्यालय परिसरात विद्यार्थ्यांना एड्स प्रतिबंधक शपथ देण्यात आली. या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राहुल तट्टे, डॉ. प्रा. सिद्धार्थ वाठोरे (कला व विज्ञान महाविद्यालय, कारगाव) राष्टीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. अमोल ठाकरे सहा.कार्यक्रम अधिकारी प्रा. छाया ढाकुलकर , प्रा. मुकुंद काळे, प्रा. सुरेंद्र कदम प्रा. डॉ. राहुल गजभिये , प्रा. उमेश माटोडे उपस्थित होते.
याप्रसंगी महाविद्यालयामध्ये ‘रेडरिबन क्लबची ’ स्थापना करण्यात आली.
या कार्यक्रमात रासेयो स्वयंसेवक तसेच विद्यार्थी उत्स्फुर्तपने सहभागी झालेत. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अमोल ठाकरे तर आभार प्रा. उमेश माटोडे या विद्यार्थ्याने केले.