आयटक संघटनेची मागणी.
नांदगाव खंडेश्वर/तालुका प्रतिनिधी
अमरावती जिल्हा बांधकाम कामगार संघटना आयटक यांच्या वतीने ना.संतोष खाडे कामगार मंत्री,महाराष्ट्र राज्य यांना निवेदन देण्यात आले तसेच त्या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी व सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय अमरावती यांच्याकडे न देण्यात येऊन त्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की,बांधकाम कामगारांना इमारत व इतर बांधकाम कामगार महामंडळ यांच्याकडून 28 प्रकारच्या योजना राबवल्या जातात त्यामध्ये पेटीचा लाभ हा आतापर्यंत सरकार देत आहे व आताही ती योजना चालू आहे सुरक्षा संच व अत्यावश्यक संच हे सरकार देत आहे.गृहपयोगी संचामध्ये ताट, वाट्या,पाण्याचे ग्लास पातेले,झाकण्यासह पातेले,झाकण्यासह मोठा चमचा,पाण्याचा जग,दोन लिटर मसाला डब्बा,परत प्रेशर कुकर,कढई स्टील,स्टीलची टाकी, असे एकूण 30 नग मिळणार आहेत त्याकरिता बांधकाम कामगारानी नवीन रजिस्ट्रेशन करून आपले स्वतःचे बांधकाम कामगार कार्ड रिन्यूअल करून ठेवले आहे पण गृहपयोगी वस्तूचा जीआर येऊन सुद्धा कामगार अजूनही मिळालेले नाही. बांधकाम कामगारांनी या गृहपयोगी संचाचा लाभ घ्यावा व सर्व बांधकाम कामगारांनी आपले कार्ड रिन्यूअल करून घ्यावी रिन्यूअल करणाऱ्यांनाच या योजनेचा लाभ मिळेल गृहपायोगीचा संच लवकरात लवकर सुरू करण्यात यावा.
अशी मागणी बांधकाम कामगार मंत्री ना. संतोष खाडे याना निवेदन देण्यात आले निवेदन देताना प्रभाकर सहदेव शिंदे अमरावती जिल्हा बांधकाम कामगार संघटना नांदगाव खंडेश्वर यांचेसह बांधकाम कामगार विजय दांडेकर, प्रफुल चव्हाण, किशोर प्रधान,मोहम्मद हारून, शेख इस्लाम, सतीश पेटकर , सतीश बिटले, आशिष महाले, इमरान शेख,शेख मतीन, शेख नईम,इत्यादी उपस्थित होते.