नांदगाव खंडेश्वर येथे भव्य शेतकरी मेळावा संपन्न.
सत्यपाल महाराज,पंजाब डख, नरेशचंद्र ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती.
महीला,पुरुष आणि शेतकऱ्यांचा प्रचंड जनसमुदाय.
नांदगाव खंडेश्वर/ उत्तम ब्राह्मणवाडे.
अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष तथा सहकार नेते अभिजीत पाटील ढेपे यांच्या वाढदिवसानिमित्त नांदगाव खंडेश्वर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भव्य अश्या शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याचे उद्घाटक म्हणून अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आ. बच्चू कडू होते.तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार नरेशचंद्र ठाकरे हे होते.प्रमुख अतिथी म्हणून सत्यपाल महाराज हवामान तज्ञ पंजाब डख, अभिजीत ढेपे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती प्रभात ढेपे,उपसभापती विलास सावदे, तुकाराम भस्मे, सुहासिनी ढेपे, अरुण पडोळे, रामपाल महाराज,रवींद्र गायगोले,आनंद काळे,जयप्रकाश पटेल,प्रशांत डहाणे,अजय मेहकरे,ज्ञानेश्वर हांडे,विलास चोपडे,डॉ.राजेंद्र पांडे,प्रमोद ठाकरे,संजय कणसे आनंद काळे,गजानन मेटकर, धनंजय मेटकर यांचेसह जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. या भव्य अस्या शेतकरी मेळाव्याच्या उद्घाटनापूर्वी कृषी उत्पन्न बाजार समिती मधील अनेक विकासात्मक कामांचा लोकार्पण सोहळा आ. बच्चू कडू यांचे हस्ते संपन्न झाला. या मेळाव्यामध्ये शेतकऱ्याकरिता रक्तदान शिबिर सुद्धा घेण्यात आले होते. यावेळी सत्यपाल महाराज यांचे किर्तन संपन्न झाले त्यानंतर पंजाब डख यांनी सुद्धा शेतकऱ्यांना विविध विषयावर मार्गदर्शन केले यावेळी महिला बचत गटाच्यावतीने तयार करण्यात आलेल्या वस्तू आणि कृषी साहित्याची प्रदर्शनी कृषी साहित्य घरगुती वस्तू इत्यादींचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. तसेच शेतकऱ्यांकरिता चर्मरोग, नेत्ररोग,आणि अस्थिरोग यांची मोफत तपासणी सुद्धा करण्यात आली ही तपासणी डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यांच्या चमूने केली.यावेळी अभिजीत ढेपे यांनी काढलेल्या दिनदर्शिकेचे विमोचन करण्यात आले.
यावेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना आ.बच्चू कडू म्हणाले की, या देशातील शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत गंभीर असून त्यांच्या हाताला काम नाही आणि मालाला दाम नाही तसेच या मतदारसंघातील युवक हे बेरोजगार आहेत त्यांना रोजगाराचे कोणतेही साधन उपलब्ध नसल्याने बेरोजगारांची मोठी फळी उभी झालेली आहे या देशात जातीपातीचे राजकारण सुरू आहे महाराष्ट्र हे फुले,शाहू, आंबेडकरांचे आहे येथे जातीपातीच्या राजकारणाला थारा नाही या मतदारसंघातील नागरिकांनी अभिजीत ढेपे यांच्या पाठीशी उभे राहावे प्रहार पक्ष आणि मी ताकतीने त्यांच्या पाठीमागे आहे जिल्हा बँके ही शेतकऱ्यांची बँक आहे बँकेमध्ये मोठ्या प्रमाणात आम्ही आल्यापासून बदल घडवून आणलेला आहे आम्ही कृतीवर भर देणारे आहोत जिल्हा बँक ही शेतकऱ्यांच्या हितासाठी कटीबद्ध आहे. आम्ही शेतकऱ्यांची मुल आहोत त्यामुळे शेतकऱ्यांची व्यथा काय हे आम्हाला चांगल्या पद्धतीने माहित आहे जिल्हा बँकेमध्ये कोणत्याही शेतकऱ्याला त्रास होणार नाही आम्ही याची दक्षता घेत असतो आणि त्यांना नवनवीन योजना बँकेमार्फत उपलब्ध करून देत आहोत आमची बँक ही शेतकरी शेतमजुरांची बँक आहे शेतकऱ्यांनी आपल्या प्रश्नांना घेऊन आता पेटून उठले पाहिजे आम्ही धर्मार्थ नाहीत 75 वर्षाच्या कार्यकाळात शेतकऱ्यांच्या हाती फक्त निराशात आली आहे देशात आज प्रचंड समस्या आहेत परंतु राज्यकर्त्यांना फक्त जाती धर्माचे राजकारण आठवत आहे आजच्या घडीला सोयाबीन, कापसाला भाव नाही त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे राज्यकर्त्यांना शेतकऱ्यांच्या समस्येशी काहीही देणे घेणे नाही त्यामुळे जातीवादी शक्तींना आपली जागा दाखवून देण्याची हीच खरी वेळ आहे सरकारने कांदा निर्यात बंद केली आहे,संत्रा उत्पादकांच्या मालाला भाव नाही, नागरिकांना स्वतःचे घर नाही ही एक शोकांतिकाच म्हणावी लागेल.
देशात फक्त मताचे राजकारण सुरू आहे शहरी आणि ग्रामीण भागातील घरकुलधारकांना गरज असतानाही घरकुल मिळत नाही शहरी आणि ग्रामीण निधीत प्रचंड तपावत आहे याबाबत अनेकदा शासनाला मी जाब विचारला आहे माझ्याशिवाय दुसरा कुणीही आमदार शासनाला जाब विचारत नाहीत आमची ही लढाई विषमतेच्या विरोधात आहे आरोग्य,शिक्षण,रोजगार यावर कोणीही बोलायला नाही लोकप्रतिनिधींना नागरिकांच्या समस्येशी काही देने घेणे नाही जातीच्या नावाने मते मागून विजयी होण्याचा सपाटा काही लोकांनी लावला आहे त्यामुळे आता वेळ आली आहे की,सर्व नागरिकांनी अभिजीत ढेपे यांच्या पाठीशी उभे राहुंन त्यांना विधानसभेत पाठविण्याची मग मी पाहतो की या तालुक्यांचा कसा विकास होत नाही असा टोला यावेळी आ. बच्चु कडू यांनी लावला अभिजीत ढेपे यांनी आपल्या बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात विकास केलेला आहे जर ते आमदार झाले तर तालुक्याचा आणि मतदार संघाचा विकास केल्याशिवाय राहणार नाहीत ते एक अभ्यासू व्यक्तिमत्व आहे असे सुद्धा यावेळी आ.कडू म्हणाले. पुढे बोलताना म्हणाले की, शेतकऱ्यांची पेरणी ते कापणी पर्यंतची कामे ही सरकारने रोजगार हमी योजनेतून करावी ही आमची प्रमुख मागणी आहे आणि ती मी ज्याप्रमाणे दिव्यांग मंत्रालय मंजूर करून घेतले त्याचप्रमाणे मंजूर करून घेणार आहे मग त्यासाठी मला काहीही करावे लागले तरी चालेल असे सुद्धा आमदार कडू शेतकऱ्यांच्या प्रचंड समुदायाला मार्गदर्शन करताना म्हणाले.
यावेळी अभिजीत ढेपे बोलताना म्हणाले की, शेतकऱ्यांच्या शेतीमालाला शासनाने योग्य भाव देण्याची ही वेळ आहे परंतु शासन त्याकडे हेतू परस्पर दुर्लक्ष करीत आहे शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी मी कुणासोबतही जायला तयार आहे कुणाशीही युती करायला तयार आहे त्यासाठीच मी जिल्हा बँकेत बच्चू कडू यांच्यासोबत गेलो आहे आज या तालुक्याचा विकास मोठ्या प्रमाणात खुंटलेला आहे तालुक्यात युवकांच्या हाताला काम नाही अनेक युवक बेरोजगार आहेत शेतकऱ्यांची अत्यंत बिकट परिस्थिती या तालुक्यात आहे शेतकऱ्यांच्या समस्येवर कुणीही बोलायला तयार नाही त्यामुळे या मतदारसंघात परिवर्तन घडवून आणणे हे आपले एकमेव कर्तव्य आहे आणि यासाठी मी आता पुढाकार घेणार असल्याचे यावेळी बोलताना जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अभिजीत ढेपे म्हणाले.
आपल्या अध्यक्ष भाषणात नरेशचंद्र ठाकरे म्हणाले की, बच्चू कडू आणि अभिजीत ढेपे या दोघांमध्येही शेतकऱ्याविषयी प्रचंड तळमळ आणि आस्था आहे त्यामुळे मी यांच्यासोबत आहे ज्याप्रमाणे या दोघांनी जिल्हा बँकेत बदल घडवून आणला आहे आणि बँक आज या प्रगतीकडे वाटचाल करीत आहे त्याचप्रमाणे आपण सर्वांनी अभिजीत ढेपे यांच्या पाठीमागे उभे राहून त्यांना पाठिंबा द्यावा असे झाल्यास ते या तालुक्याचा आणि मतदार संघाचा सुद्धा विकास करायला मागे पाहणार नाही भय्यासाहेब ढेपे हे माझे गुरुबंधू होते ते या तालुक्याचा गौरव होते त्यांना या तालुक्याविषयी प्रचंड तळमळ होती तीच तळमळ अभिजीत यांच्यामध्ये आहे आज या बाजार समितीचा विकास पाहून मनाला आनंद झाला या तालुक्यातील आणि मतदार संघातील नागरिकांनी अभिजीत ढेपे यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन आपल्या अध्यक्षीय भाषणातून माजी आमदार नरेशचंद्र ठाकरे यांनी उपस्थित शेतकरी महिला पुरुषांना केले. या मेळाव्याला सुमारे दहा हजार महिला पुरुषांची प्रचंड उपस्थिती होती हा मेळावा तालुक्यातील अभूतपूर्व असा पहिलाच मेळावा असल्याचे नागरिकांमध्ये बोलल्या जात होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाजार समितीचे संचालक डॉ. राजेंद्र पांडे,संचालन विलास मारोटकर,तर आभार प्रदर्शन बाजार समिती संचालक प्रमोद ठाकरे यांनी केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सर्वश्री गजानन ढेरे,अरुण ठाकरे,अंकुश कणसे, दिपक सवाई, गजानन सावदे,ओमप्रकाश सावळे, जितेश जांगडा, विवेक वैष्णव, मो. जावेद कुरेशी,विजय अजबले,अर्चना कणसे,सोनाली लेंडे, यांचेसह तालुक्यातील महिला,पुरुष शेतकऱ्यांचा प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता.