माहुली चोर/प्रतिनिधी.
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील माहुली चोर येथील शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकाच्या नुकसानीचे विमा कंपनीने पंचनामे करून सुद्धा नुकसान भरपाई दिली नाही.म्हणुन नुकसान भरपाई मिळवून देण्या बाबत येथील शेतकऱ्यांनी तहसीलदारान कडे मागणी केली आहे.
खरीप हंगाम २०२३ मध्ये पावसाच्या खंडामुळे सोयाबीनची वाढ खुटली होती. तसेच वातावरणातील बदलामुळे पिवळा मोझ्याक हा विषाणुजन्य रोग आला होता. त्यामुळे सोयाबीन पिकाचे खूप मोठे नुकसान झाले होते.या बाबत माहुली चोर येथील ज्या शेतकर्यांनी पिक विमा काढला होता त्यातील काही शेतकऱ्यांनी विमा कंपनी कडे तक्रारी केल्या होत्या यातील काही शेतकऱ्याच्या पिकाचे विमा कंपनी कडून पंचनामे सुद्धा करण्यात आले परंतु अजूनही येथील शेतकर्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही.
म्हणुन विमा कंपनी कडून नुकसान भरपाई मिळवून देण्या बाबत येथील निखील चोरे, राजेश कोकाटे,मनोहर पवार,प्रफुल वाघ,गोपाल तिखीले,विनेश गायकवाड,अतुल जाधव,सचिन कोल्हे यांचे सह ईतर शेतकऱ्यांनी तहसीलदार,कृषीअधिकारी यांचे कडे केली आहे.