नवनीत राणा व अनिल बोंडेंनी बेंद्रेला दिली चांदीची गदा.
बहिरम येथे भाजपा नेते गोपाल तिरमारेंचे आयोजन.
चांदूरबाजार /तालुका प्रतिनिधी.
चांदुर बाजार तालुक्यातील श्री क्षेत्र बहिरम येथे नमो बहिरम केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन भाजपा नेते गोपाल तीरमारे व विदर्भ कुस्तिगीर संघ यांचा विद्यमाने करण्यात आले होते तर सोलापूर येथील एकनाथ बेंद्रे प्रथम बहिरम केसरीचा मानकरी ठरला यावेळी राज्यसभा खासदार अनिल बोंडे व लोकसभा खासदार नवनीत राणा यांच्या हस्ते बहिरम केसरी पैलवान एकनाथ बेंद्रे याला चांदीची गदा व पारोतोषिक देण्यात आले.
यावेळी भाजपा नेते सुधीर रसे, मनोहर सुने,नंदकिशोर वासनकर,प्रवीण तायडे,मुरली माकोडे,चक्रधर गुलक्षे, अक्षरा लहाने,बाळासाहेब सोनार,नंदू बर्वे,वैभव मनवर संजय थेलकर,नितीन टिंगणे,प्रणित खवले, हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे प्रा. संजय तिरथकर उपस्थित होते.
विदर्भातील सर्वात मोठी असणारी यात्रा बहिरम येथे दरवर्षी श्री क्षेत्र बहिरम बाबा यात्रेमध्ये मोठ्या संखेत राज्यभरातून यात्रेकरू दाखल होत असतात त्याच पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या यात्रेच्या खुल्या मैदनात यावर्षी बहिरम केसरी कुस्ती स्पर्धेच आयोजन करण्यात आले होते तर राजयभरातील कुस्तीपटू बहिरम मध्ये शामिल झाले होते जोरदार अंतिम सामना कोल्हापूर येथुन महाराष्ट्र चैम्पियन पैलवान संकेत पाटील व उपमहाराष्ट्र केसरी पैलवान एकनाथ बेंद्रे यांच्यात राजयसभा खासदार अनिल बोंडे व लोकसभा खासदार नवनीत राणा यांच्या उपस्थितीत पाहायला मिळाला तर चिमुकल्या पैलवानाची देखील कुस्ती हजारोच्या उपस्थितीत असलेल्या प्रेक्षकांना पाहायला मिळाली.
भाजपा नेते गोपाल तिरमारे व विदर्भ केसरी पैलवान संजय तिरथकर सह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते,सियाराम हेल्थ क्लब, हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ यांच्या अथक परिश्रमाने नमो बहिरम केसरी कुस्ती स्पर्धेच आयोजन यशस्वी ठरलं तर वर्ष २०२५ मध्ये ही बहिरम केसरी कुस्ती स्पर्धेच आयोजन होणार असल्याची माहिती गोपाल तीरमारे यांनी दिली.