नांदगाव खंडेश्वर/प्रतिनिधी.
खाशाबा जाधव यांच्या जयंती निमित्य एकलव्य धनुर्विद्या अकादमी मध्ये सोमवार १५ जानेवारी २०२३ ला पहिला राज्य क्रीडा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला. यानिमित्याने मैदानावर धनुर्विद्या स्पर्धेचे व पतंग स्पर्धेचे आयोजन केले होते. कार्याक्रमची सुरवात भारताला ऑलिम्पिक मध्ये पहिले व्यक्तिगत पदक प्राप्त करून देणारे खाशाबा जाधव यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून झा
स्पर्धेचे उद्घाटन परमपूज्य श्रीकृष्णकुमार पांडेयजी महाराज यांच्या हस्ते झाले, त्यावेळी त्यांनी गुरुवर विश्वास ठेऊन खेळाडूंनी अधिक जास्त सराव करून नांदगाव चे नाव देशपातळीवर मोठे करावे अशी इच्या व्यक्त केली. यावेळी अकादमीचे मार्गदर्शक व शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त श्री सदानंद जाधव यांनी खेळाडूंनी ऑलिम्पिक च्या तयारीकरिता वाटेल ती तयारी करून ध्येयाकडे वाटचाल करायची असून पूर्ण वेळ खेळाडूंच्या पाठीशी असल्याचे सांगितले.
तसेच युवा सप्ताहा निमित्य एकलव्य गुरुकुल स्कूल आयोजित पतंग महोत्सव मध्ये मोठ्या प्रमाणात विद्यार्थी/ विद्यार्थिनी यांनी पतंग स्पर्धेत सहभाग घेतला. पतंग स्पर्धेवेळी परमपूज्य श्रीकृष्णकुमार पांडेयजी महाराज यांनी पतंग उडवून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविला. कार्यक्रमाकरिता पवन जाधव (वनपरिक्षेत्र अधिकारी), विशाल ढवळे (अध्यक्ष),विलास मारोटकर (मुख्याध्यापक ),अनुप काकडे (व्यवस्थापक),अमर जाधव (धनुर्विद्या प्रशिक्षक )प्रमोद कोठार,जनार्धन पांडव, उपस्थित होते.तसेच स्पर्धेकरिता एकलव्य गुरुकुल चे शिक्षकवृंद पंकज खांडेकर, मोहित झोपाटे, गजानन शेळके,ईश्वर जाधव,सुरेंद्र चौधरी,सूर्यवंशी सर, श्रीकांत खांडेकर,स्वप्निल पाटील उपस्थित होते.या कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता अकादमीचे राष्टीय खेळाडू ऋषिकेश चांदुरकर,सुमित गुरमुळे,हर्शल दैत,अनिरुद्ध खंडारे,साक्षी तोटे,श्रेया खंडार,सानिका चांदुरकर,ओजस्वी साळवे यांनी परिश्रम घेतले.