२०० अंगणवाडी व मदतनीस सहभागी.
नांदगाव खंडेश्वर / तालुका प्रतिनिधी
विविध मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी मागील ४ डिसेंबर पासून बेमुदत संप पुकारला आहे. परंतु अद्यापही शासनाने संपाची दखल घेतली नाही. त्यामुळे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज १७ जानेवारी रोजी अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या वतीने पंचायत समिती नांदगाव खंडेश्वर समोर धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
मागिल ४५ वर्षापासून अंगणवाडी सेविका मदतनीस या मानधन तत्वावर काम करीत आहेत.त्यामुळे अंगणवाडी सेविकांना किमान २५००० हजार रुपये तर मदतनीसांना १८००० हजार रुपये मानधन देण्यात यावे,टी ए बिलाची ग्रॅड पुर्णपणे बोलावून ते टी ए बिल काढण्यात यावे,नविन मदतनिसांचे स्थगित असलेले मानधन देण्यात यावे बहुतांशी ठिकाणी विधवा व परीकत्तवता आहेत.
त्यामुळे त्यावर उपाशमारी ची वेळ येवू नये, त्यामुळे या आंदोलनात सहभागी आहोत असे प्रतिपादन सेविकांना दिले, पंचायत समिती परीसरात विरोधी घोषणा बाजी करून परीसर दणाणून सोडला होता या आंदोलनात त्यावेळी अंगणवाडी कर्मचारी संघटना तालुका अध्यक्ष रेखा नवरंगे उपाध्यक्ष संगिता तांबेकर .दिपाली पुसदकर सुरेखा गोपाळे रूखसाना खातुन विखेताई कापसेशं संध्या काळे न्ंदा खडसे मुंजेवार नागदिवे तसेच मदतनीस मधुन अंजु गुल्हाने माधुरी पाटील, वैशाली मुधोळकर सविता सोनोने सुनंदा ठाकरे व सुमारे १८० ते २००अंगणवाडी सेविकांची व मदतनीस उपस्थिती होती.