गटविकास अधिकारी यांच्याकडे गावकऱ्यांची तक्रार.
नांदगाव खंडेश्वर / तालुका प्रतिनिधी
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील येवती येथिल मेरी माटी मेरा देश या योजनेच्या अंतर्गत ग्रामपंचायत मार्फत झाडाच्या लागवडीचे काम करण्यात आले आहे त्यामध्ये कामावरील लोकांच्या नावे पैसे त्याच्या बॅक किवा पोस्ट खात्यात जमा होतात, परंतु जो व्यक्ती त्या कामावर नाही अशा व्यक्तीच्या नावे पैसे काढण्यात आले आहे, आणि त्याच्या नांवाने
हजेरी पटक्रमांक ५४२० दि. १२/९/२३/१८/९२३ या कालावधीत तेच व्यक्ती समृद्धी महामार्गाच्या कामावर हजेरी पटक्रमांक मध्ये दिसून येत असल्याचा आरोप गावातील नागरिकांनी नांदगाव खंडेश्वर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रकाश नाटकर यांचे कडे तक्रारीतून केला आहे. त्यामुळे गटविकास अधिकारी यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषीवर कारवाई करण्यात यावी अशा मागणीची तक्रार गावातील नागरिकांनी पंचायत समितीमध्ये येऊन निवेदन दिले.निवेदन देताना युवासेना उपजिल्हा प्रमुख (उबाठा) माजी सरपंच गोकुळ राठोड,युवासेना तालुका प्रमुख (उबाठा)अभिजीत तायडे, तुषार मोरे,तेजस सोरते,सागर येवतीकर,तेजस काळसर्पे,रेखा रामटेके ,बेबी चिवडे,कांचन नाईक,शंकर मेश्राम, दुर्गा जडळकर इंद्राबाई मेश्राम,ललीता चंदकापुरे, सुभद्रा देवगडे, वैशाली झोडापे, दिपक सुलताने,आदी गावकरी यावेळी उपस्थित होते.