कुषी उत्पन्न बाजार समितीचे आयोजन.
पत्रकार परिषदेत संचालकांची माहिती.
नांदगाव खंडेश्वर /तालुका प्रतिनिधी
नांदगाव खंडेश्वर कुषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने भव्य अश्या शेतकरी मेळाव्याचे आयोजन दिनांक २२ जानेवारी रोजी करण्यात आले असुन या मेळाव्याचे उद्घाटन अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा माजी मंत्री ओम प्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.तर प्रमुख अतिथी म्हणून सत्यपाल महाराज यांचे शेतकऱ्यांना जनजागृतीपर कीर्तन होणार आहे, तसेच शेती व हवामान तज्ञ पंजाबराव डख हे शेतकरी वर्गाला मार्गदर्शन करणार आहेत, त्याचं प्रमाणे भव्य महिला बचत गट वस्तू व घरगुती साहित्यांचे प्रदर्शन या मेळाव्यात करण्यात येणार आहे.
या प्रदर्शनात मध्ये रक्तदान शिबीर, शेतकऱ्याकरिता मोफत ECG नेत्र तज्ञ तपासणी,चर्मरोग, स्त्रीरोग,अस्थिरोग, याची सुद्धा मोफत तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती आज झालेल्या पत्रकार परिषदेत नांदगाव खंडेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रभात ढेपे उपसभापती विलास सावदे यांनी पत्रकारांना दिली. या मेळाव्याला अमरावती जिल्ह्यातून किमान 5000 शेतकरी महिला पुरुष यांची उपस्थित असणार असल्याची माहिती यावेळी पत्रकार परिषदेत देण्यात आली.
या मेळाव्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा धर्म काठाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तरी या शेतकरी मेळाव्याचा लाभ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी घेण्याची मागणी करण्यात आली आहे या पत्रकार परिषदेला कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळ सर्वश्री.डॉ राजेन्द्र पांडे, विलास चोपडे,प्रमोद ठाकरे, गजानन ढेरे,अनिल लेंडे, धनंजय मेटकर,जितेश जांगडा, विवेक वैष्णव आदी उपस्थित होते.