चांदुर रेल्वे/प्रतिनिधी
तालुक्यातील श्री क्षेत्र सावंगा विठोबा येथील श्री विठोबा संस्थान समोर सांस्कृतिक भवन मध्ये दि.२० जानेवारी २०२४ रोजी अमरावती येथे आयोजित महाराष्ट्र मंदिर न्यास अधिवेशन (अमरावती-विदर्भ प्रांत) अनुषंगाने चांदुर रेल्वे, धामणगाव रेल्वे व नांदगाव खंडेश्वर या तालुक्यातील संस्थान ,देवस्थान ,मंदिराचे विश्वस्त यांची सभा दि.१५/१/२०२४ सोमवारला दुपारी १२.०० वाजता निलेश टवलारे, हिंदू जनजागृती समिती जिल्हा समन्वयक, अनुप जयस्वाल, महाराष्ट्र मंदिर महासंघ सदस्य, कैलासकुमार पनपालिया, महाराष्ट्र मंदिर महासंघ अमरावती जिल्हा निमंत्रक यांचे उपस्थितीत आयोजित करण्यात आली होती.
या सभेत संस्थान संबंधित सर्व समस्या या महत्त्वाचे विषयावर मार्गदर्शन होणार आहे,तरी या सभेला नियोजित स्थळी उपस्थित राहावे तसेच श्री क्षेत्र धामंत्री येथील सभेला जे संस्थान, देवस्थान व मंदिर विश्वस्त उपस्थित होवू शकले नाहीत त्यांनी या सभेला विषेशतः उपस्थित राहावे असे आवाहन विश्वस्त मंडळ श्री विठोबा संस्थान उर्फ श्रीकृष्ण अवधूत बुवा संस्थान श्री क्षेत्र सावंगा विठोबा यांनी केले आहे.