आनंदमय वातावरणात भागवत सप्ताहाचे समारोप.
हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ.
नांदगाव खंडेश्वर/तालुका प्रतिनिधी.
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील फुबगाव येथे श्री संत सुरेश बाबा संस्थानमध्ये संत सुरेशबाबा यांच्या 64 व्या. जयंतीनिमित्त श्रीमद् भागवत कथेचे आयोजन करण्यात आले होते.या कथेचे भागवतकार श्रद्धेय श्री. कृष्णकुमार पांडेय महाराज काशी याच्या सुमधुर वाणीतून भागवत कथा ऐकण्याची संधी मिळाली. महाराजांनी अतिशय सुंदर प्रकारे 7 दिवस भागवत कथेचे वाचन केले. यावेळी यजमान म्हणून श्री मधुकर दिवेकर, मोतीरामजी मुंडवाईक, जयकुमार शेळके, अरुणभाऊ धवस, घाटळकर हे सपत्नीक 7 दिवस पूजेला बसून आपली सेवा दिली. या भागवत सप्ताह मधे पहाटेच्या वेळी गावातील वारकरी मंडळींच्या काकड आरतीने गावातील वातावरण मंत्रमुग्ध होऊन गावकरी मोठ्या आनंदात भक्तिमय वातावरणात तल्लीन झाले होते. दररोज रात्री हरिपाठ, भारुड आणि हरिकिर्तनात ह.भ. प. श्री अरुण महाराज कांबळे, देव्हारे महाराज, अनिकेत कडू महाराज यांचे हरिकीर्तन झाले.
या सर्व कार्यक्रमाचा गावकरी आणि भक्त मंडळींनी मोठया प्रमाणात लाभ घेतला. भागवत सप्ताहाच्या समारोपीय कार्यक्रमात सकाळी गावामधून पालखी व मिरवणूक सोहळा सकाळी 8 वाजता सुरू होऊन दुपारी 2 वाजता पार पडला,यावेळी 40 दिंडी मंडळ सहभागी झाले. श्री सुरेश बाबा समाधी आणि आश्रम यावर फुलांची अतिशय सुंदर सजावट करण्यात आली होती. काल्याचे कीर्तन हे देवदत्तजी आढाव महाराज कळंब यांच्या वाणीतून हजारोंच्या संख्येने भाविक भक्तांनी श्रवण केले, यावेळी त्यांच्या साथीला मृदंग वादक निवृत्ती पाटील महाराज, गायक प्रकाश वैरागडे, प्रवीण भलावी, देविदास चौधरी, मृदंग वादक हितेश शेळके, सुरेश धवस, महादेव वाघ, विनायक दिवेकर, रविभाऊ काळमेघ इ. पंचक्रोशीतील वारकरी संप्रदाय उपस्थित होते. यावेळी संस्थानचे अध्यक्ष श्री अरुण भाऊ जाधव यांनी उपस्थित प्रमुख मंडळी यांचे आदरातिथ्य केले. या सोहळ्याला संपूर्ण गावामधे घरोघरी मोठ्या प्रमाणात पाहुणे मंडळी दाखल झाली. गावकरी मंडळी या सोहळ्याला दिवाळी मानतात आणि त्याच उत्साहात घरोघरी रांगोळी काढून तयारी करतात व पालखी सोहळ्याला संपूर्ण गावामधे उत्सुकता असते आणि त्याच पद्धतीने हा सोहळा साजरा केला जातो.
गावातील सर्वच समाज बांधव यामधे आपली सेवा देतात. यावेळी मोठ्या प्रमाणात महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते आणि हजारोंच्या संख्येने भाविक भक्तांनी महाप्रसादाचा आस्वाद घेतला, संपूर्ण तालुक्यातील भाविक भक्त हे मोठ्या प्रमाणात आपली सेवा देतात. प्रगटदिना निमित्त दरसाल प्रमाणे मोठ्या प्रमाणात यात्रा भरली होती. यावेळी अभिजित ढेपे, ह भ.प. वंदनाताई माहुरे यांची विशेष उपस्थिती होती. या सर्व आयोजनात श्री संत सुरेश बाबा संस्थान विश्वस्त मंडळ व गावकरी यांच्या नियोजनाने हजारोंच्या संख्येने आलेल्या भाविकांच्या उपस्थितीत हा दिमाखदार सोहळा पार पडला.