तालुका उपाध्यक्ष पदी श्याम पाठक.
भाज्युमोच्या धामणगाव विधानसभा संयोजक पदी अक्षय म्हस्के यांची नियुक्ती.
नांदगाव खंडेश्वर/तालुका प्रतिनिधी.
नांदगाव खंडेश्वर तालुक्यात भाजपच्या नवीन पदाधिकाऱ्यांच्या नुकत्याच नियुक्त्या करण्यात आलेल्या असून भाजपच्या तालुका सरचिटणीस पदी मोखड येथील रवि राऊत यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
तर तालुका उपाध्यक्ष म्हणून फुबगाव येथील श्याम पाठक यांची तर भारतीय जनता युवा मोर्चाच्या धामणगाव रेल्वे विधानसभा संयोजकपदी धामक येथील युवा कार्यकर्ते अक्षय म्हस्के यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे नुकत्याच एका कार्यक्रमात सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना आमदार प्रताप अडसड यांचे हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले यावेळी माजी जि्. प.सदस्य रवींद्र मुंदे,ज्येष्ठ नेते सुरेश गायधनी,तालुका अध्यक्ष निकेत ठाकरे,श्याम राऊत,अजय निर्मळ यांची उपस्थिती होती. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.अभिनंदन कर्त्यामध्ये प्रशांत वैद्य,विलास वितोंडे,ना.ख. शहराधक्ष नवल खिची,अविनाश ब्राम्हणवाडे,अजगर पठान,अमित दहातोंडे, इश्वर टेवरे, इत्यादी कार्यकर्त्यांचा समावेश आहे.