विभागीय परिवहन महामंडळ आयुक्त यांना दिले निवेदन.
नांदगाव खंडेश्वर/तालुका प्रतिनिधी.
नांदगाव खंडेश्वर बसस्थानकामध्ये ग्रामीण गाडीचे वेळापत्रक लावण्यात यावे नांदगाव खंडेश्वर ते अमरावती बस फेऱ्या वाढविण्यात यावे नांदगाव ते चांदुर रेल्वे बस फेऱ्या वाढवावे चोर माऊली धानोरा गुरव लोणी टाकळी शिंगणापूर या गावांना जलद अति जलद शिवशाही गाडीचे थांबे देण्यात यावे नांदगाव खंडेश्वर हे तालुक्याचे ठिकाण असून तालुक्याकडे आपल्या विभागाकडून दुर्लक्ष होत आहेत.
नांदगाव खंडेश्वर ते अमरावतीला लागून असल्यामुळे लोणी टाकळी माऊली चोर धानोरा गुरव शिंगणापूर या गावांना तालुक्यातील बरेच गावे मोठ्या प्रमाणात जोडलेली असल्यामुळे या गावातील नागरिकांना ये जा करण्याकरता या चार स्टॉप वरूनच ये जा करावी लागते परंतु या चारही बस स्टॉप वर जलद अति जलद गाड्या थांबत नाही त्यामुळे सदर गावातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे तरी मागणीचा विचार करून या चारही गावांना जलद अति जलद शिवशाही या गाड्यांचे थांबे द्यावे त्याचप्रमाणे बडनेरा ते गोळेगाव गाव बस व्यवस्था कुठलीही नसल्यामुळे ही बस पूर्ण वर्षभर नेहमी करण्यात यावी सदर मार्गावर बस सुरू आहे परंतु फक्त शाळेचे दिवसापर्यंत मर्यादित आहे तरी वरील बाबींचा गांभीर्याने विचार करून वरील मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्यात याव्या अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे टाईल आंदोलन करण्यात येईल जिल्हाध्यक्ष राज पाटील जिल्हा उपाध्यक्ष गजानन काजे पाटील तालुकाध्यक्ष निलेश मुधोळकर उप तालुकाध्यक्ष निखिल गोंदे बडनेरा शहराध्यक्ष गौरव बानते पुरुषोत्तम भाऊ काळे सामाजिक कार्यकर्ते दिनेश पांडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते