नांदगाव खंडेश्वर/तालुका प्रतिनिधी.
माहुली चोर येथे नियमित डाॅक्टर चे अभावामुळे पशुपालक त्रस्त. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील माहुली चोर येथील शासकीय पशुवैध्यकीय दवाखाना आहे. परंतु या दवाखान्यात मागील एक महीण्यापासुन नियमित डाॅक्टर नाही.
त्यामुळे या भागातील पशुपालक,पाळीव प्राणी पालक यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. माहुली चोर येथे राज्य शासनाचा पशुवैध्यकीय दवाखाना आहे. यात माहुली तसेच परिसरातील गावातील शेतकरी आपले गुरे, ढोरे, पाळीव प्राणी येथे उपचारा करीता आणतात. परंतु एक महीण्या पुर्वी येथील नियमित डाॅक्टर सेवानिवृत्त झाल्याचे समजते. तेव्हा पासून या दवाखान्यात नियमित डाॅक्टर नाही.तसेच येथील कंम्पाउंडर सुध्दा बरेच दिवसा आजारी असलेल्याचे सांगितले जाते. येथे प्रभारी असलेले डाॅक्टर आठवड्यात केवळ दोन दिवस काही वेळा करीताच येतात.दवाखान्यात आलेल्यांना गौपालच दवाखान्यात आलेल्यांना मार्गदर्शन करतात. त्या मुळे पशुपालकांना गुरांच्या उपचारा करीता मोठी समस्या निर्माण होत आहे. तरी येथील दवाखान्यात नियमित डाॅक्टर द्यावा अशी येथील पशुपालकांची मागणी आहे.