अमरावती/प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना जिल्हा अमरावती ची सभा आज दिनांक 4/2/2024 रोजी अमरावती येथे संपन्न झाली या ठिकाणी संघटनेचे विभागीय अध्यक्ष श्री. सुरेश चिमणकर, विभागीय सरचिटणीस श्री. महादेव राठोड,संघटनेचे मार्गदर्शक श्री. अनिल कोल्हे, श्री.नरेश शुक्ला तसेच मा.श्री. संदीप बोडखे (गटशिक्षणाधिकारी, पं. धामणगाव, चांदुररेल्वे), व मा. श्री संतोष घुगे(शिक्षण विस्तार अधिकारी, भातकुली)हे प्रमुख पाहुणे म्हणून उपास्थित होते.सभे मध्ये नवीन जिल्हा कार्यकारिणी व तालुका रिक्त पदावर खलील प्रमाणे नियुक्त्या करण्यात आल्या.
जिल्हाध्यक्ष श्री राजाभाऊ राजनकर,जिल्हा कार्याध्यक्ष श्री विनायक पवार,जिल्हा सरचिटणीस श्री निलेश टोम्पे, उपाध्यक्ष दिलीप सोनकुसरे, मकरंद खेडकर, देवेंद्र फड,किरण गादेकर, कोषाध्यक्ष प्रदीप राऊत, जिल्हा संघटक नंदकीशोर दिंडोकार,बाळासाहेब धनजक,सहसचिव प्रशांत पवार,रवींद्र शिखरे, जिल्हा प्रसिध्दी प्रमुख अंकुश गावंडे, नांदगाव खंडेश्वर तालुका अध्यक्ष प्रवीण ढोके, कार्याध्यक्ष प्रकाश बावनकुळे, सरचिटणीस विष्णू आडे, चांदूररेल्वे तालुका अध्यक्ष दीपक धांडे, कार्याध्यक्ष उमेश कापसे, सरचिटणीस विशाल चव्हाण,भातकुली तालुका अध्यक्ष संदीप झाडे,कार्याध्यक्ष विजय महर्षी,सरचिटणीस रविंद्र विल्हेकर, अमरावती तालुका अध्यक्ष उमाकांत जीरापुरे,तिवसा तालुका अध्यक्ष छत्रपती ढवळे या प्रमाणे नवीन जिल्हा कार्यकारिणी तथा रिक्त तालुका कार्यकारिणी गठीत करण्यात आली.या ठिकाणी पाहुण्यांच्या हस्ते श्री.अंकुश गावंडे यांना राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार व श्री. अजय अडकिने यांना जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला तसेच श्री अशोक बेरड व श्री दिलीप केने हे सेवानिवृत्त झाले त्या बद्दल त्यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला. संघटनेच्या भविष्यातील कामकाज व ध्येय धोरणविषयी तसेच शिक्षकांच्या विविध समस्या व शैक्षणिक उपक्रम यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.या सभेला जिल्ह्यातून मोठ्या संख्येत शिक्षक सेनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते