विद्यार्थ्यांना केले मार्गदर्शन.
नांदगाव खंडेश्वर/तालुका प्रतिनिधी.
नांदगाव खंडेश्वर येथील प्रा राजाभाऊ देशमुख कला महाविद्यालय येथे राष्ट्रीय सेवा योजना आणि रेड रिबन क्लब अंतर्गत एनएसएस शिबिर नियोजन आणि Hiv Aids या विषयावर मारगदर्शन पर कार्यशाळा घेण्यात आली.एनएसएस शिबिर नियोजन समिती गठीत करण्यात आली.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुर्यवंशी सर यांनी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम विद्यार्थांसाठी सर्वांगीण विकास होण्यासाठी किती महत्त्वाचे आहे.या वर सविस्तर मार्गदर्शन केले. प्रा डॉ चंदा जगताप मॅडम यांनी मोबाईल चा अतिवापर आणि आरोग्यावर होणारे परिणाम या वर माहिती दिली.
तसेच Good Manners कीती उपयोगी पडतात हे सांगितले.Hiv Aids या घातक आजारापासून युवकांनी कसा बचाव करावा ,त्यावर उपाय कोणते, प्रतिबंधक उपाय ,या विषयावर सचिन वानखेडे समुपदेश ग्रा ,रू ,नांदगाव खंडेश्वर यांनी सखोल मा्गदर्शन केले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा डॉ राजेश मेश्राम एनएसएस कार्यक्रम अधिकारी यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा अनिता सोनुले यांनी केले.