शेतकऱ्यांना सरसकट पाच लाखापर्यंत कर्जमाफी देण्याची मागणी.
अन्यथा आंदोलनाचा दिला इशारा.
नांदगाव खंडेश्वर/ तालुका प्रतिनिधी
अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरसकट पाच लाखापर्यंत कर्जमाफी देण्याची मागणी शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष छोटू मुंदे यांनी जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांचे मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांना निवेदनाद्वारे मागणी केलेली असून ही मागणी मान्य न झाल्यास शेतकरी संघर्ष समितीचे वतीने जिल्हाभर आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरसकट पाच लाखापर्यंत कर्जमाफी देण्यात यावी,दोन राज्यातून आणणारी आयात बंदी तत्काळ बंद करण्यात यावी,शेतकऱ्यांना पिक विमा त्वरित देण्यात यावा, सोयाबीनला सात हजार रुपये क्विंटल आणि कापसाला दहा हजार रुपये क्विंटल देण्यात यावा
सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यात यावा, जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाची रिक्त पदाची भरती तात्काळ करण्यात यावीत,जिल्ह्यातील जि.प.शाळेच्या शिकस्त झालेल्या इमारतीची दुरुस्त करण्यात यावी, जिल्हा परिषद शाळेचे खाजगीकरण थांबवण्यात यावे, या मागणीचा निवेदनामध्ये समावेश आहे.या सर्व मागण्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जातीने लक्ष देऊन लवकरात लवकर सोडविण्याची मागणी सुद्धा शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष छोटू मुंदे यांनी केली असून या मागण्या पूर्ण न झाल्यास अमरावती जिल्ह्यातील सर्व तालुक्यात जाऊन शेतकऱ्यांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.आणि तरी सुद्धा या मागण्या पूर्ण न झाल्यास अन्नत्याग आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.निवेदन देताना शेतकरी हरीश बोरकर,क्रांतीवीर नवले,अमोल सरोदे,तेजस मुंदे,मनोज राऊत,अशोक मुंदे, ज्ञानेश्वर देवरे,वैभव बोरकर इत्यादी उपस्थित होते.