नांदगाव खंडेश्वर/ तालुका प्रतिनिधी.
दिनांक ६/२/२०२४ रोजी नांदगाव खंडेश्वर तालुक्यामध्ये राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम अंतर्गत स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान तालुका आरोग्य अधिकारी डॉ. स्वप्निल मालखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबविण्यात येत आहे.
“कुष्ठरोगा विरुद्ध लढा देऊन, कुष्ठरोगाला इतिहास जमा करूयात.” या घोषवाक्याने प्रभात फेरीला प्रारंभ झाला.तसेच तालुका आरोग्य अधिकारी यांनी कुष्ठरोग मुक्त करण्यासाठी समाजामध्ये जनजागृती करून कुष्ठरोग इतर आजाराप्रमाणे जंतूपासून होणारा रोग आहे.औषधोपचाराने 100% बरा होते .कुष्ठारोग हा स्पर्शाने मुळीच पसरत नाही.हा आजार अनुवंशिक नाही.पाप पुण्याचा या रोगांशी कुठलाही संबंध नाही.कुष्ठजंतू हवे मार्फत शरीरात प्रवेश करतात.जडीबुटी तंत्र मंत्र हे आजारांवरील उपाय नसल्याचे सांगून तालुका आरोग्य अधिकारी डॉ. स्वप्नील मालखेडे यांनी मार्गदर्शन केले.
तसेच शरद अंबडकर कुष्ठरोग तंत्रज्ञ यांनी कुष्ठरोगाची लक्षणे कोणती आहेत ,त्यावरच्या उपचार पद्धती कशा आहेत,आणि कुष्ठ रुग्णान करिता असणाऱ्या विविधयोजना याबाबत मार्गदर्शन केले.प्रभात फेरी मध्ये विनायक विज्ञान महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी जनजागृती बाबत पथनाट्याचे उत्कृष्ट सादरीकरण केले.प्रभात फेरीला श्री. प्रकाश नाटकर (गटविकास अधिकारी ), डॉ. स्वप्नील मालखेडे (तालुका आरोग्य अधिकारी),श्री. सुनील सोळंके (पोलीस निरीक्षक),श्री. गजानन मेश्राम् (पशु वैद्यकीय अधिकारी),श्रीमती. प्रेमिला शेंडे ( गट शिक्षणाधिकारी) यांनी हिरवी झेंडी दाखवून प्रभात फेरीला सुरवात केली. यावेळी विनायक विज्ञान महाविद्यालय नांदगाव खंडेश्वर येथील प्राचार्य डॉ. अल्का भिसे, डॉ. सुचिता खोडके (प्राध्यापक) ,श्री दशरथ काळे (प्राध्यापक) ,श्रीमती कविता काकडे (प्राध्यापक) व महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी व प्राध्यापकवृंद यांनी सहभाग नोंदवला व मोलाचे सहकार्य केले.
तसेच तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातील श्रीमती कमल धुर्वे (विस्तार अधिकारी),श्री सुनील खेडीकर( विस्तार अधिकारी),श्री राजू मेश्राम ( आरोग्य सहाय्यक),श्री शरद अंबाडकर ( कुष्ठरोग तंत्रज्ञ),श्री सुरेश बारबुद्धे ( आरोग्य सेवक),श्री आनंद कोराने ( तालुका लेखापाल),श्री अभिजीत वडनेरकर (तालुका समूह संघटक),श्री योगेश मोकदम( कार्यक्रम सहाय्यक), श्री भरत गाठेकर( वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक),श्री शुभम ढोले,तसेच पंचायत समिती मधील सर्व अधिकारी व कर्मचारी वृंद उपस्थित होते.