गावकऱ्यांनी केली आमदार अडसड यांच्याकडे तक्रार.
नांदगाव खंडेश्वर /तालुका प्रतिनिधी.
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मंगरूळ चव्हाळा येथे पिण्याच्या पाण्याकरिता नजीकच्या साखळी धरणाचे पाणी मिळणार आहे. याकरिता गावात पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे. गावातील संपूर्ण रस्ते पाईपलाईनच्या कामासाठी खांदून ठेवलेले आहे रस्त्यावर खड्डे केलेले आहे ते लवकरात लवकर दुरुस्ती करण्याकरिता ग्रामपंचायत व ठेकेदारांना वारंवार सांगण्यात आले आहे तरी ते रस्ते दुरुस्त करत नाही आहे त्यामुळे ते लवकरात लवकर दुरुस्त करावे याकरिता आ. प्रताप अडसड यांना निवेदन देण्यात आले आहे.
पाईपलाईनचे काम लवकरात लवकर आटपावे व सुरळीत पाणीपुरवठा करावा याकरिता आ.प्रताप अडसड यांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदन देताना विक्रम हरिभाऊ भेंडे यांनी हे निवेदन आमदारांना दिले.या कडे लक्ष देऊन लवकर पाईपलांचे काम पूर्ण करावे ही विनंती सुद्धा आमदार साहेबांना करण्यात आली निवेदन देताना गावातील गावकरी मंडळी आशिष श्रीवास. ईश्वर टेवरे. संदीप शिरभाते. निखिल पोहेकर गजानन काकडे. उपस्थित होते.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरन सदर काम करीत आहे या कामाची किंमत 14 कोटी रुपये असून आजूबाजूच्या 5 गावाला पाणी पुरवठा केला जाणार आहे. त्यामध्ये मंगरूळ चव्हाळासह हरणी,वेणी गणेशपुर,कणी मिर्झापूर,शिंवणी रसुलापूर, गावनेर तळेगाव या गावाचा समावेश आहे.