मंगरूळ चव्हाळा/ अनिकेत शिरभाते.
मंगरुळ चवाळा पोलीस स्टेशन यांना गोपनीय माहीती दि.5/2/2024ला मिळाली की एक पांढ-या रंगाचे बोलेरो पिकअप लोडींग गाडीमधे काही गोवंश जातीची जनावरे कर पध्दतीने एकमेकांना पायास व मानेला तोंडास बांधून निर्दयपणे कत्तलीकरिता वाहून नेल्या जानार आहे वरुन सालोड येथे नांकाबंदी केली असता मंगरुळ चचाळा कडून एक पांढ-या रंगाची पिकप गाडी भरधाव वेगाने येतांना दिसली. त्या गाडीस हात दाखवुन थांबण्याचा ईशारा केला असता त्यातील चालकाने त्याचे वाहन काही अंतरावर थांचविले आरोपी मोहम्मद याकुच मोहम्मद नजर वय ५९ वर्ष रा. चिकनी डोमगा ता. नेर. जि. यवतमाळ यांनी आपले बोलेरो पिकप, कमांक एम एच २९/बिई ३३०६ मध्ये ०६ गोवंश जातीची जनावरे अत्यंत कुर पध्दतीने एकमेकांना पायास व मानेला तोंडास बांधून निर्दयपणे वाहतुक करीत असतांना मिळुन आले. आरोपींच्या ताब्यातुन गोवंश जातीची जनावरे एकुण ६ किंमत ९३००० रुपये जनावरांना बांधन्याकरिता वापरलेल्या नॉयलॉन दो-या किंमत अंदाजे १०० रुपये व वाहतुकीकरीता वापरलेले वाहन कमांक एम एच २९/बिई ३३०६ किंमत अंदाजे ५. ००,००० रुपये, असा एकूण ५,९३,१००/-रुपयांचा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करण्यात आला.
आरोपी विरूध्द पो.स्टे. मंगरूळ चवाळा येथे अपराध कमांक १६/२०२४ कलम २७९ भा.द.वी ११(१) (ड) प्राण्यांना निर्दयतेने वागविणे कायदा सहकलम ५(१) (ए)५ (ची)९,९ (ए) महा. प्राणी सरेक्षन कायदा १९७६ सुधारीत अधिनियम सन २०१५ कलम १११ महा.पोलीस कायदा सहकलम २३९/१७७ मो.वा.का प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन, जप्त जनावरे डॉ. पंजाबराव देशमुख गौमाता गौरक्षण चारीटेबल ब्रस्ट, कणी मिर्झापुर रजि. नं. ११३० येथे ठेवण्यात आलेली आहेत. सदर कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक सा. श्री विशाल आनंद सर, अपर पोलीस अधिक्षक पंकज कुमावत सर, उपविभागीय पो.अधि.सुर्यकांत जगदाळे सर यांचे मार्गदर्शनाखाली रविंद्र बारड ठाणेदार पोस्टे मंगरुळ चव्हाळा सपोउपनि मनोज सावरकर च.न.४२. नापोकों उमेश चंदर ब.न.२०७४ पोकों मनोज चौधरी ब.न.३६५, पोकों प्रविन चक्षाण ब.न.१६२७ चालक पोकों गोवर्धन पवार ब.न.६९१ यांनी केली पुढील तपास सपोउपनि मनोज सावरकर ब.न.४२ करित आहे.