बदलत्या शैक्षणिक शैलींनी शिक्षक हतबल.
विद्यार्थी झालेत मुजोर.
नांदगाव खंडेश्वर/ उत्तम ब्राम्हणवाडे.
आजच्या बदल्या शैक्षणिक वातावरणाने शिक्षक, विद्यार्थी व पालकांसमोर हतबल झाले आहेत. विद्यार्थ्यांवर डोळे जरी वटारले तरी पालक शाळेत येवुन गुरूजीला दम भरू लागल्याने शिक्षकांवर मोठा प्रसंग गुदरत आहे. परिणामी विद्यार्थी मुजोर झाले आहेत. पूर्वी शिक्षकांचा वर्गाबरोबरच वर्गाबाहेरही दबदबा राहत असे. गुरूजी रस्त्याने जरी जात असले तरी विद्यार्थी दडून बसत. ‘छडी लागे छमछम विद्या पेई घमघम’ या तालावर शिक्षण शिकविलेली जाई.
आता मात्र बदलत्या शिक्षण शैलीने शिक्षकाची छडी हरवली आहे. कमी वेतन घेऊन मन लावुन शिकविणारे शिक्षक व शिक्षणाची जिद्द उराशी बाळगुन शिक्षण घेणारे विद्यार्थी आज मोठमोठ्या पदावर कार्यरत आहेत. कोणी अधिकारी, कोणी कर्मचारी, कोणी डॉक्टर, इंजिनिअर झाले आहेत. त्यावेळी शिक्षणाची गोडी, मारायची भिती, गरीब परिस्थिती व जिवनात काही तरी बनण्याचे ध्येय उराशी बाळगुन शिक्षण घेत. तर त्या विद्याथ्यांना पोट तिडकीने शिकविण्यासाठी चिखल तुडवत, पायी, सायकलवर, कमी वेतन घेऊन आपले विद्यार्थी घडावेत व आपल्या नौकरीचे चिज व्हावे या हेतुने सर्वांना समान शिक्षण देण्याचा प्रयत्न शिक्षक करी. काम पडल्यास छडीचा प्रसादही देत असत. त्यामुळेच ‘छडी लागे छमछम, विद्या पेई घमघम’ अशी म्हण प्रचलीत पडली. त्यामुळे अनेक विद्यार्थी घडले. उच्च पदावर गेले. गुरु-शिष्याच नात घट झाल. मात्र कालातराने शिक्षण शैली बदलत गेली. आणि शिक्षकांची छडी गेली. भरमसाठ पगार वाढले. मात्र शिक्षणाची ऐशी तैशी झाली. सध्या विद्यार्थी मुजोर झाले असून शिक्षा करता येत नसल्याने हतबल झाले. त्यामुळे विद्यार्थी घडण्याचे प्रमाण कमी झाले. बेकारी वाढली. अशा बेरोजगार विद्यार्थ्यांच्या हाताला काम नसल्याने तरुणांमध्ये व्यसनाधिनता वाढली. चुकून एखादा विद्यार्थी क्लासवन अधिकारी बनत आहे. एकंदर शिक्षकांची छडी हरवली असून विद्यार्थी मुजोर व शिक्षक हतबल झाले आहेत असे म्हणने वायगे ठरणार नाही.
भरमसाठ पगार घ्या आणि गप्प बसा!
पूर्वी शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांस घडविण्यासाठी वेळ प्रसंगी छडीचा वापर करत असत. शिक्षणाची गोडी, माराची भिती व गरीब परिस्थितीच्या जाणीवेतून विद्यार्थीही जिवनात काहीतरी बनण्याचे ध्येय उराशी बाळगुन शिक्षण घेत. एखादा विद्यार्थी मोठ्यापदावर लागला की, शिक्षकास आकाशठेंगणे वाटे एवढा आनंद त्यांना त्यावेळी होत असे. बदलत्या शैक्षणिक शैलीने शिक्षकांची परिस्थिती केवीलवाणी झाली आहे. विद्यार्थ्यांवर हात जरी उगारला तरी जाब विचारण्यास पालक दुसऱ्याच दिवशी शाळेत येवू लागले आहेत. त्यामळे पगार घ्या आणि गप्प बसा अशी परिस्थिती शिक्षकांची झाली आहे.