राजकमल ते पोस्ट ऑफिसपर्यंत पायदळ.
ओबीसी आरक्षण बचाव करिता पोस्टात लेखी हरकती.
अमरावती / प्रतिनिधी.
ओबीसी समाजाच्या आरक्षणाचा विषय अत्यंत गंभीर झाला असून ओबीसी समाजाच्या वतीने आज अमरावती येथे राजकमल चौकात भव्य स्वाक्षरी अभियान राबवण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने अमरावती जिल्ह्यातील ओबीसी बांधव या अभियानात सहभागी झाले.
तर ओबीसी आरक्षण बचाव या मोहिमेंतर्गत आज राजकमल चौक ते पोस्ट ऑफिस पर्यंत पायदळ मार्च करण्यात आला यावेळी पोस्ट ऑफिस परिसरात असणाऱ्या टपाल पेटीमध्ये मोठ्या संख्येने ओबीसी आरक्षण बचाव या संदर्भात हरकती पोस्टाने मंत्रालयापर्यंत पाठविण्यात आल्या यावेळी मोठ्या संख्येने ओबीसी बांधव आपल्या हरकती दाखल करण्याकरता पोस्ट कार्यालयाच्या परिसरात दाखल झाले होते.
ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू नये याकरता हे अभियान अमरावती शहरात सुरू आहे यामध्ये ओबीसी समाजातील विविध संघटना सहभागी झाल्या होत्या विविध क्षेत्रातील नेते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते