माहुली चोर/विजय नाडे.
दि.7 रोजी रात्री माहुली चोर येथील अमरावती- यवतमाळ रोड वर असलेल्या दोन दुकानाचे शेटर वाकवुन अज्ञात चोरट्यांनी दुकानातील रोख रक्कम लंपास केली. येथील बसथांब्या लगत महेश कोल्हे यांचे कृषी केंद्र व राजुरकर यांचे हार्डवेअर चे दुकान आहे.
दि.7 रोजी रात्री कोल्हे आपले दुकान बंद करून घरी गेले. सकाळी त्यांच्या दुकाचे शेटर वाकल असल्याचे परिसरातील नागरिकांच्या लक्षात आले. याची माहिती अंकुश कोल्हे यांना दिली. त्यांनी दुकानात पाहणी केली असता गल्यातील 7100 रु.चोरीला गेल्याचे लक्षात आले. तसेच राजुरकर यांच्या हार्डवेअर दुकानातील रोख रक्कम चोरीला गेली. याची माहिती लोणी पोलीसांना देण्यात आली असुन. पोलीसांनी घटनास्थळी येवुन पाहणी केली.
तसेच राजुरकर यांच्या हार्डवेअर दुकाना जवळ असलेल्या सागर चोरे यांच्या दुकानात लावलेल्या सि. सि. टि. व्ही. कॅमेरात साकाळी 4:43 ला टुव्हीलर वर दोन व्यक्ती तोंडाला बांधून आले व त्यांनी आधी सागर चोरे यांच्या दुकान चे शटर वाकविण्याचा प्रत्यन्न केला पण त्यांनी ते सोडून दिले. व राजुरकर यांचे दुकान कडे गेले. व परत येवुन अमरावती कडे जाताना दिसुन येत असेल्याचे सागर चोरे यांनी सांगितले. या चोरी मुळे नागरीकात भिती निर्माण झाली आहे.