कामाला लागण्याचे हर्षवर्धन देशमुख यांचे आवाहन.
महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती.
नांदगाव खंडेश्वर /,उत्तम ब्राह्मणवाडे.
नांदगाव खंडेश्वर येथील पद्मपाणी मंगलकार्यालय येथे महाविकास आघाडीची बैठक पार पडली. लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून पूर्वतयारीला वेग आला आहे. वर्धा लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाकडून माजी कृषिमंत्री व श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख आपले भाग्य आजमावणार आहेत त्यांना शरद पवार यांनी लोकसभेच्या तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत.
यानिमित्त आयोजित विचार विनिमय बैठकीला तालुक्यातील महाविकास आघडीचे नेते, सक्रिय कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
सर्वांची मते जाणून घेत ही बैठक पार पडली.यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार,काँग्रेस, शिवसेना उद्धव ठाकरे गट, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष नेते कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.या सभेत अनेकांनी आपले विचार मांडले.सर्वांची उपस्थिती पाहता विजयाचा मार्ग सुकर असल्याचे कार्यकर्ते बोलत होते.राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची हर्षवर्धन देशमुख यांचेशी जवळीक आहे.त्यांचा सगळीकडे दांडगा जनसंपर्क पाहता ही लढत थेट होणार असल्याचे बोलल्या जात आहे.
उचित उमेदवार राष्ट्रवादी शरद पवार गटाने दिल्यामुळे कार्यकर्ते आनंदी आहेत. हर्षवर्धन देशमुख यांच्यासाठी पूर्ण परिश्रम करणार असल्याचे सूतोवाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार, काँग्रेस, शिवसेना उबाठा, भाकप, माकप सर्व पक्षातील पदाधिकाऱ्यांनी बोलून दाखविले. यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे या सभेच्या अध्यक्षस्थानी सुनील वऱ्हाडे हे होते तर अतिथी म्हणून गणेश रॉय,हेमंत देशमुख,तुकाराम भस्मे, संगीता ठाकरे, सुरेश कहाते,प्रदीप राऊत, आदी मान्यवर होते या विचार सभेला हर्षवर्धन देशमुख यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत सर्व कार्यकर्त्यांनी एकजुटीने भेदभाव विसरून कामाला लागण्याचे आवाहन केले व आपला विजय निश्चित असल्याचे म्हटले.
या सभेलाकिशोर गुलालकरी, श्रीकृष्ण रंगाचार्य, धनंजय तोटे, रोशन कडू, अनिल ठाकरे, मनोज गावंडे, किशोर भेंडे, प्रवीण भेंडे, हितेश शेळके, पंकज ठाकरे,साजिद भाई,संदीप कणसे, मनोज काळबांडे, विलास काळमेघ, मोहन चोरे, शिवराज वाकोडे, जयश्री बावणे, मोनाली क्षीरसागर, अमोल हिरोडे, राहुल भाकरे, आशिष परणकर,गौरव भोयर, भाकपचे तुकाराम भस्मे, सुनील मेटकर, माकपचे शाम शिंदे, शिवसेना (उबठा) गटाचे बाळासाहेब भागवत, मनोज कडू, ओंकार ठाकरे,बाळासाहेब राणे,बाळासाहेब राणे, प्रमोद कोहळे, विलास सावदे,प्रमोद ठाकरे,तसेच सचिन रिठे व लालचंद इंगोले यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिनदर्शिकाचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले या सभेचे प्रास्ताविक राष्ट्रवादीं काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सुरेश कहाते,संचालन प्रा. जगदीश गोवर्धन तर आभार प्रदर्शन प्रा. नितीन टाले यांनी केले