नांदगाव खंडेश्वर/तालुका प्रतिनिधी.
स्थानिक नांदगांव खंडेश्वर येथिल मराठा शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचालित, रामराव भोयर विद्यालय नांदगांव खंडेश्वर मध्ये महाराष्ट्र राज्य वाहतूक सुरक्षा दिवस व नागरी सुरक्षा दिवस साजरा करण्यात आला या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री ए.बी . घोरपडे तर प्रमुख उस्थितीमध्ये श्री पी. पी. टिंगणे व श्रीमती एस एन. जंगले हे उपस्थित होते.
याप्रसंगी विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्य वाहतूक सुरक्षा दलाचे कार्य व नागरी सुरक्षा रक्षक म्हणून विद्यार्थ्यांनी घ्यावयाची काळजी याबद्दल मारगदर्शन करण्यात आले.या कार्यक्राअंतर्गत विद्यार्थ्यांना अग्निशामक यंत्राच प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले. याप्रसंगी विद्यालयातील सर्व विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री एस. डी. मुंढे यांनी केले तर आभार श्री जी. एम. राठोड यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांनी सहकार्य केले.