नांदगाव खंडेश्वर/तालुका प्रतिनिधी.
आयुष्मान भव कार्यक्रमातर्गत आयुष्मान आरोग्य मंदिर दाभा येथे आरोग्य तपासणी शिबीर दिनांक 10.2.2024 ला पार पडले
ग्रामीण रुग्णालय नांदगाव चे वैद्यकीय अधीक्षक डॉ अजयकुमार नाथक साहेब व तालुका आरोग्य अधिकारी डॉ स्वप्नील मालखेडे सर यांच्या मार्गदर्शनात आय सि टी सि चे समुपदेशक श्री सचिन वानखडे व येच यल यल लॅब च्या श्रीमती मीना राऊत यांनी विविध प्रकारच्या रक्ततपासन्या मोफत करण्यात आल्या.
तसेच वजन उंची घेऊन बी एम आय काढण्यात येऊन समतोल आहाराची माहिती देण्यात आली.समुदाय आरोग्य अधिकारी डॉ प्रियंका धानुका मॅडम यांनी रुग्णांची तपासणी करून औषधपचार केले.
शिबिराला यशस्वी करण्यासाठी दाभा चे आरोग्य सेवक राजेंद्र चकुले यांनी परिश्रम घेतले. या शिबिराचा 48 लोकांनी लाभ घेतला व जनतेने समाधान व्यक्त केले. याच कार्यक्रमात जंतनाशक मोहिमेची माहिती उपस्थिताना दिली.