चांदुर रेल्वे/तालुका प्रतिनिधी.
चांदुर रेल्वे तालुक्यातील बग्गी जावरायेथे श्री संत सुरेश बाबा यांच्या जन्मोत्सव निमित्त पालखी सोहळा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते. सलग 30 वर्षापासून जावरा येथील पोलिस पाटील डॉ. विलास गाढवे हे या सोहळ्याचे आयोजन करतात. या सोहळ्यात गावातील सर्वच लोक सहभागी होऊन सोहळा आनंदाने साजरा करतात.
पंचक्रोशीतील असंख्य नागरिक या सोहळ्याला आवर्जून उपस्थित असतात. गावामधून सकाळीच मिरवणूक काढली जाते ही मिरवणूक समाधी स्थळी जाऊन तिथे पूजा व आरती केल्या जाते. त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम सुरू होतो.
हजारो भक्तमंडळी या महाप्रसादाचा आस्वाद घेतात. तसेच यावेळी 40 भजनी मंडळ सहभागी झाले होते. एक दिवसाच्या या सोहळ्याने संपूर्ण गावकरी हे भक्तिमय वातावरणात तल्लीन होऊन हा सोहळा मोठ्या उत्साहाने पार पाडतात.