कार्यालय फक्त कागदोपत्रीच मंजूर.
नांदगाव तालुक्यातील नागरिकांची ३५ की.मी वर भटकंती.
नांदगाव खंडेश्वर/उत्तम ब्राम्हणवाडे.
अमरावती जिल्हा परिषदेने आपल्या अखत्यारीत येणाऱ्या चौदाही तालुक्यातील ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यालये हे प्रत्येक तालुक्यातील पंचायत समितीच्या परिसरामध्ये सुरू करण्याचा निर्णय गेल्या एक वर्षापूर्वी घेतला होता पूर्वी चौदाही तालुक्याचे पाणीपुरवठा संबधित कार्यालये ही अमरावतीच्या जिल्हा परिषदेच्या परिसरामध्ये होती त्यामुळे प्रत्येक तालुक्यातील नागरिकांना अमरावती येणे सोईचे होत असल्याने या सरपंच आणि नागरिकांचा वेळ आणि पैसा जात होता आणि वेळेवर कामही होत नसल्याने जिल्हापरिषदेने प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी ही कार्यालये सुरू करण्याचा निर्णय घेतला असून यामुळे पाणीपुरवठ्याच्या कामात सुसूत्रता येण्याचा मुख्य उद्देश शासनाचा होता शासनाच्या या आदेशाचे पालन जिल्ह्यातील चौदा तालुक्यापैकी तेरा तालुक्यात होऊन हे कार्यालय सुरू सुद्धा करण्यात आलेले आहे परंतु शासनाच्या आणि जिल्हा परिषदेच्या आदेशाला नांदगाव खंडेश्वर तालुक्यात मात्र वाटण्याच्या अक्षदा दाखऊन हरताळ फासण्याचे काम करण्यात आल्याची बाब येथे नुकतीच उघडकिस आली असून नांदगाव खंडेश्वर येथील पंचायत समितीच्या परिसरात या कार्यालयाला प्रशस्त अशी जागा असतानाही हे कार्यालय गेल्या एक वर्षापासून सुरूच करण्यात आलेले नाही हे विशेष ! सदर कार्यालय फक्त कागदोपत्रीच सुरू करण्यात आल्याची माहिती आहे.
नांदगाव खंडेश्वर तालुक्यात 68 ग्रामपंचायती येतात त्या अंतर्गत 133 गावे येतात या सर्व गावातील पाणी पुरवठ्याच्या संबंधित कामे ही ग्रामीण पाणी पुरवठा कार्यालया मार्फत केली जाऊन त्यांच्या सर्व अडीअडचणी सोडविण्याचे काम या कार्यालया मार्फत केल्या जाते परंतु हे कार्यालय नांदगाव खंडेश्वर येथील पंचायत समितीमध्ये सुरूच झाले नसल्याने तालुक्यातील 133 गावातील नागरिकांना 35 की.मी.अंतरावर अमरावती जिल्हा परिषदेमध्येच जाऊन पायपीट करावी लागत आहे परंतु तिथे सुद्धा अधिकारी,कर्मचारी त्यांना मिळत नसल्याने ते अधिकारी नांदगाव येथे गेले असल्याचे सांगण्यात येते.त्यामुळे हे अधिकारी आपल्या घरूनच काम करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वेळीच लक्ष देण्याची मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहे नुकताच आता उन्हाळा सुरू होत असून भविष्यात नांदगाव खंडेश्वर तालुक्यात पाणी टंचाई जानऊ शकते त्यामुळे हे कार्यालय कडक उन्हाळा सुरू होण्यापूर्वी कार्यरत होणे महत्वाचे आहे आणि तसेही या तालुक्यात पिण्याच्या पाण्यासाठी येकदा गोळीबार सुद्धा झालेला असल्याने या सर्व बाबीचा विचार करून हे कार्यालय सुरू करण्याचे आदेश नव्यानेच रुजू झालेल्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी देण्याची मागणी नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील सरपंच आणि नागरिकांनी केली आहे हे कार्यालय येत्या आठ दिवसांत सुरू न झाल्यास पंचायत समिती समोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
नांदगाव खंडेश्वर पंचायत समितीचे परिसरात ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यालय मंजूर करण्यात आले आहे.त्याकरिता जागा सुद्धा मिळाली आहे फर्निचरचे काम लवकरच सुरू होईल परंतु तोपर्यंत त्याठिकाणी नागरिकांच्या तक्रारी घेण्यासाठी एक कर्मचारी लगेच नियुक्त करुन कामकाज सुरू करण्याचे आदेश देण्यात येत आहे आणि विना विलंब हे कार्यालय सुरू करण्यात येईल.