टोंगलाबाद येथील प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना शालेय स्वेटर्स वाटप.
कार्यक्रमास ठाणेदार सुनील सोळंके व पत्रकार उत्तम ब्राह्मणवाडे यांची प्रमुख उपस्थिती.
नांदगांव खंडेश्वर/ तालुका प्रतिनिधी .
नांदगाव खंडेश्वर येथे नव्यानेच स्थापन करण्यात आलेल्या अतुल्य – भारत सामाजिक, शैक्षणिक या सामाजिक संस्थेद्वारे 19 फेब्रुवारी रोजी नांदगांव बसस्थानक परिसरात शिवजयंती साजरी करण्यात आली.कार्यक्रमादरम्यान शालेय विद्यार्थ्यांनी शिव गित, पोवाडा साजरा करून मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून सुरवात करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेच्या उपाध्यक्ष अश्विनी जुनघरे यांनी तर आभार प्रदर्शन महिला प्रतिनिधी रंजना वानखडे यांनी केले. या कार्यक्रमाला संस्थापक अध्यक्ष राजेश कडू, यांच्यासह कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ठाणेदार सुनील सोळंके, प्रमुख अतिथी पॉवर ऑफ मिडीया अमरावती विभागीय अध्यक्ष उत्तम ब्राह्मणवाडे, सचिव पवन ठाकरे उपस्थित होते.
मान्यवरांनी आपले भाषणे करीत संस्थेच्या माध्यमातून भविष्यात करण्यात येणार्या सामाजिक कार्याला शुभेच्छा दिल्या.यासह टोंगलाबाद येथील प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना शालेय स्वेटर्स वाटप सुद्धा करण्यात आले. यावेळी संस्थेचे तालुका अध्यक्ष राहुल हजारे, उपाध्यक्ष अश्विनी जुनघरे, गजानन भस्मे, सचिव प्रतीक कोल्हे, सहसचिव हेमंत बावनकुळे, कोषाध्यक्ष उमेश चव्हाण,सह कोषाध्यक्ष माधवी थोरात, सांस्कृतिक प्रमुख ओम मोरे, विद्यार्थी प्रमुख सिद्धेश तर्हेकर, सदस्य धनंजय पोच्ची, प्रविण शहाडे, करुणा चव्हाळे, कविता देवळे, भाग्यश्री दुधे यांच्यासह शालेय विद्यार्थी व नांदगाव येथील नागरिक मोठ्याप्रमाणात उपस्थित होते.