प्रा.श्याम मानव यांचे प्रतिपादन.
नांदगाव खंडेश्वर येथे व्याख्यान संपन्न.
नांदगाव खंडेश्वर/उत्तम ब्राम्हणवाडे.
हिंदू राष्ट्राच्या नावाने पुन्हा एकादा देशात मनुस्मृती लागू करण्याचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा डाव असून त्यांची राजकीय आघाडी असलेल्या भारतीय जनता पक्षाची वाटचाल त्या दिशेने सुरु असून आर . एस . एस . चा हा डाव हाणून पाडण्यासाठी सर्व संविधान प्रेमी जनतेने सज्ज राहण्याचे आवाहन अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. श्याम मानव यांनी केले . ते फुले शाहू आंबेडकर विचार मंच नांदगांव खंडेश्वरच्या वतीने “भारतीय लोकशाही समोरील आव्हाने ” या विषयावर आयोजित केलेल्या व्याख्याना मध्ये बोलत होते . चार्तुवर्ण व्यवस्थेच्या नावाने मनुस्मृतीच्या आधारे इथल्या शुद्राती शुद्र समाजाला माणूस म्हणून जगण्याचा हक्क नाकारला होता . शेकडो वर्षाच्या या अन्यायाचा दाह एससी ,एसटी , ओबीसी , वर्गाला भोगावा लागला आहे . छत्रपती शिवाजी महाराज शुद्र असल्यामूळे येथील ब्राम्हणी व्यवस्थेने त्यांचा राज्याभिषेक करण्याचे नाकारले होते . शिवरायांचे राज्य अठरापगड जातींचे राज्य होते . सर्व जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने एकत्र राहत होते.
छात्रपती शिवराय कुण्या एका धर्माचे राजे नव्हते तर ते खऱ्या अर्थाने रयतेचे राजे होते म्हणूनच राजेशाही अस्ताच्या ३५० वर्षांनंतरही येथे घराघरात – मनामनात शिवाजी महाराज वास करतात .महात्मा जोतीराव फुले , शाहू महाराज , बाबासाहेब आंबेडकर या महामानवांनी या ब्राम्हणी व्यवस्थेविरुद्ध प्रचंड संघर्ष केला व समाजामध्ये सुधारणा घडवून आणल्या . महात्मा गांधी , पंडित नेहरू व इतर अनेक नेत्यांनी देशासाठी त्याग केला . तेव्हा आपल्याला स्वातंत्र मिळाले . स्वातंत्र्यलढ्यात कवडीचाही सहभाग नसलेली विचारधारा आज देशाच्या सर्वोच्च सत्तेवर विराजमान आहे . आज आपल्याला जे काही माणूस म्हणून जगण्याचे अधिकार आहे ते केवळ संविधाना मूळे आहे . जनतेच्या संविधानिक अधिकारावर गदा आणल्या जात आहे . शेतकरी – कामगाराचे आंदोलन बळाचा वापर करून दडपल्या जात आहे . लोकशाहीचा आधारस्तंभ असलेली पत्रकारिता धोक्यात आली आहे. मालक धार्जिने कामगार कायदे करून कामगारांना देशोधडीला लावल्या जात आहे. चुकीच्या शेती धोरणामुळे शेतकरी संकटात सापडला आहे . धर्मा- धर्मात व जाती – जातीत तेढ निर्माण करण्याचा एकमेव अजेंडा भाजप सध्या राबवित आहे . समाजामध्ये वैज्ञानिक दृष्टीकोणाचा प्रसार प्रचार करणे हे सरकारची संविधानिक जबाबदारी असतांना सुद्धा सरकार काल्पनिक अवैज्ञानिक विचारांना थारा देत आहे.
शालेय अभ्यासक्रमातून डार्विनचा उत्क्रांतिवाद हद्दपार करण्यापर्यंत सरकारची मजल गेली आहे . उच्च पदस्थ नोकऱ्या , निवडणूक व्यवस्था , न्यायव्यस्था यातील वाढती ब्राम्हणी घुसखोरी आपल्या संविधानिक राज्य व्यवस्थेला खिळखिळी करीत आहे. देशाच्या पंतप्रधानाचे वर्तन “खोटे बोला पण रेटून बोला “अशा प्रकारचे आहे .आर एस एस – भाजपचे हिंदू राष्ट्र म्हणजे केवळ ब्राम्हणी वर्ण वर्चस्वाचे राष्ट्र असल्या मूळे देशात पुन्हा मनुच्या कायदयाचे राज्य प्रस्तापित करण्यासाठी जोरात तयारी सुरु आहे . त्यासाठी धर्मसंसदा आयोजित करून संघपरीवार हिंदू धर्माचा वापर राजकारणासाठी करीत आहे. ईडी,सीबीआय संस्थाचा गैर वापर करून विरोधी पक्ष फोडण्याचा नवा उद्योग जोरात सुरु आहे. ईलेक्ट्रोड बाँड व इतर भ्रष्ट मार्गाने जमा झालेल्या पैशाचा वापर करून विरोधी पक्षाचे आमदार,खासदार विकत घेवून लोकशाहीची खुलेआम हत्या भाजप करीत आहे. तेव्हा येथील संविधानिक राज्य व्यवस्था मोडित काढून हिंदू राष्ट्राच्या नावाने ब्राम्हणी – मनुस्मृतीच्या कायदयाचे राज्य निर्माण करण्याचा भाजप आरएसएस चा डाव सर्व सामान्य जनतेने ओळखून या विरुद्ध लढण्यास सज्ज राहण्याचे आवाहन आपल्या दोन तासाच्या विस्तृत विवेचनात प्रा . श्याम मानव यांनी केले.
यावेळी नांदगांव व परिसरातील संविधानप्रेमी जनतेने प्रचंड गर्दी केली होती . माजी आमदार प्रा . विरेंद्र जगताप यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कॉ . तुकाराम भस्मे , माजी आमदार ज्ञानेश्वर धाने पाटील , भाकपचे युवा नेते कॉ. सागर दुर्योधन, कॉ .सुनिल मेटकर ,शिवसेनेचे बाळासाहेब राणे , युवक काँग्रेसचे परिक्षीत जगताप, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष निशिकांत जाधव यांची उपस्थिती होती . कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी नगराध्यक्ष अक्षय पारसकर, संचालन डॉ . संजय जेवडे यांनी केले . कार्यक्रमाचे आभार अमोल धवसे यांनी मानले . कार्यक्रम यशस्वी करण्या करिता सर्फराज पठाण , दिपक भगत,नरेश ठाकरे , रमेश ठाकरे , दिपक सवाई , विनोद चौधरी , सिमाताई जाधव , चित्राताई वंजारी , सोनाली वैदय ,विनोद तरेकर , गजानन भडके , हरिदास राजगिरे , अमोल नरोडे ,समीर दहातोंडे , संतोष सुरजुसे, संजय बुधले , अजय भोयर , दिपक भगत , शंकरराव पवार ,मोरेश्वर वंजारी , माधव ढोके , राजेश जाधव अमोल राजकुळे , ओमप्रकाश सावळे , नारायणराव भगवे , हरिदास देशमुख राजुभाऊ पारधी , सचिन करडे , चंदू मेहेंगे,कांतेश्वर जगताप,मनिष सावदे,गजानन सावदे , योगेश अवझाडे ,मोरेश्वर भेंडे ,मनोज गावनेर इत्यादींनी विशेष प्रयत्न केले .